स्थानिक
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आमदार गोपीचंद पडळकर यांचा जाहीर निषेध
आमदार गोपीचंद पडळकर यांनी पंढरपूर येथे अपशब्द उच्चारल्याबद्दल.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल आमदार गोपीचंद पडळकर यांनी पंढरपूर येथे अपशब्द उच्चारल्याबद्दल आज बारामतीतील राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पडळकर यांच्याविरुध्द जोरदार घोषणाबाजी केली.
शरद पवार यांच्याबद्दल पडळकर यांनी उच्चारलेले शब्द चुकीचे असून, त्याचा आम्ही निषेध करत असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. या प्रसंगी राष्ट्रवादीचे युवक शहराध्यक्ष अमर धुमाळ, तालुका युवकाध्यक्ष राहुल वाबळे, साधू बल्लाळ यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रसंगी पडळकर यांचे पोस्टर जाळण्याचाही प्रयत्न केला गेला मात्र पोलिसांनी यात हस्तक्षेप केला. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. सोशल डिस्टन्सिंग, मास्क व सॅनेटायझर्सचा वापर करीत आंदोलन केले गेले.