राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालय उद्घाटनाला गर्दी,शहराध्यक्ष यांच्यासह शंभर ते दिडशे कार्यकर्त्यांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पोलिसांनी गर्दी जमवून कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालय उद्घाटनाला गर्दी,शहराध्यक्ष यांच्यासह शंभर ते दिडशे कार्यकर्त्यांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पोलिसांनी गर्दी जमवून कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी
बारामती वार्तापत्र रिपोर्ट
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये शनिवारी राष्ट्रवादीच्या पुण्यातील कार्यालयाचे उद्घाटन पार पडले. मात्र या उद्घाटन सोहळ्याला कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. कोरोना काळात गर्दी झाल्याने आता पोलीस काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर पोलिसांनी गर्दी जमवून कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह शंभर ते दिडशे कार्यकर्त्यांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष महेश रमेश हांडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रदीप देशमुख, माजी नगरसेवक निलेश निकम, बाळासाहेब बोडके, सरचिटणीस रोहन पायगुडे यांच्यासह शंभर ते दीडशे अज्ञान महिला व पुरुषांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार दिनेश वीर यांनी फिर्याद दिली असून, भादवी कलम 188, 269, 270 राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ब, महाराष्ट्र कोविड 19 उपाययोजना 2020 चे कलम 11 प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्यक्रमाला चारशे ते पाचशे कार्यकर्त्यांची उपस्थिती
शनिवारी सायंकाळी शिवाजीनगर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन पार पडले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने गर्दी झाली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लग्नासाठी 50, अंत्यसंस्कारासाठी 20, सार्वजनिक कार्यक्रमासाठी शासन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने परवानगी असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या या कार्यक्रमात मात्र मोठ्या संख्येने गर्दी झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या कार्यक्रमात चारशे ते पाचशे कार्यकर्ते सहभागी झाले होते. यातील अनेकांनी मास घातले नव्हते, त्यामुळे कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.