राजकीय

राष्ट्रवादी च्या वतीने डायबेटीस टाइप १” च्या “इन्सुलिन” चे वाटप.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसो व संसदरत्न,खासदार सौ.सुप्रियाताई सुळे सो यांचे पुढाकारातून व जहाँगीर ट्रस्ट वतीने.

राष्ट्रवादी च्या वतीने डायबेटीस टाइप १” च्या “इन्सुलिन” चे वाटप

बारामती: वार्ताहर आज दि.२७ मे २०२० रोजी. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसो व संसदरत्न,खासदार सौ.सुप्रियाताई सुळे सो यांचे पुढाकारातून व जहाँगीर ट्रस्ट वतीने बारामती व इंदापूर तालुक्यातील ५० मुलांना “डायबेटीस टाइप १” च्या “इन्सुलिन” चे वाटप राष्ट्रवादी काँग्रेस भवन कसबा-बारामती याठिकाणी करण्यात आले. तसेच या मुलांना कारगिल कंपनी तर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या ५० मुलांपैकी एका गरजू मुलाला ट्रस्ट ने १२०००/- रुपये किंमतीचे रेफ्रिजरेटर मोफत दिले.
यामध्ये प्रामुख्याने इन्सुलिन किट-मेडिसिन,रेफ्रिजरेटर व जीवनावश्यक वस्तू अशा एकूण ६ लाख १२ हजार रुपये किंमती च्या अत्यावश्यक वस्तूंचे वाटप तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे अध्यक्ष श्री.संभाजी होळकर,मुंबई मंत्रालय कक्ष अधिकारी श्री.अमोल भिसे,डॉ.सौरभ मुथा,जहाँगीर ट्रस्ट चे डॉ.संध्या गायकवाड व टीम यांचे हस्ते वाटप करण्यात आले.
याप्रसंगी तालुका राष्ट्रवादी वकील सेल चे अध्यक्ष श्री.रविंद्र माने,तालुका सोशल मिडिया चे अध्यक्ष श्री.सुनिल बनसोडे तसेच डायबेटिस बालक,विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!