राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचे हृदय विकाराच्या झटक्यामुळे निधन
अभिनेत्री बर्याच दिवसांपासून आजारी होत्या. 2020मध्ये सुरेखा ब्रेन स्ट्रोक आला होता.

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचे हृदय विकाराच्या झटक्यामुळे निधन
अभिनेत्री बर्याच दिवसांपासून आजारी होत्या. 2020मध्ये सुरेखा ब्रेन स्ट्रोक आला होता.
मुंबई : बारामती वार्तापत्र
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचे मुंबईत निधन झाले. अभिनेत्री बर्याच दिवसांपासून आजारी होत्या. 2020मध्ये सुरेखा ब्रेन स्ट्रोक आला होता. रिपोर्ट्सनुसार, आज सकाळी हृदय विकाराच्या झटक्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. दुसऱ्या ब्रेन स्ट्रोकमुळे त्यांच्या आरोग्यातील गुंतागुंत वाढली होती.
सुरेखा सिक्री यांना 2019 मध्ये ‘बधाई हो’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. चित्रपटांमधील तिच्या सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी सुरेखा सिक्री यांना यापूर्वी नोव्हेंबर 2018मध्ये देखील ब्रेन स्ट्रोक झाला होता. त्यादरम्यान अभिनेत्रीला अर्धांगवायू झाला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शूटिंगदरम्यान त्या खाली कोसळून पडली होती, त्यानंतर अभिनेत्रीची तब्येत हळूहळू सुधारत होती. मात्र, तरीही त्या जागीच अंथरुणाला खिळल्या होत्या.
थिएटर, सिनेमा आणि नंतर छोट्या पडद्यावर खोलवर छाप पाडणारी सुरेखा सिक्री चाहत्यांच्या लाडक्या अभिनेत्री होत्या. चित्रपटांमध्ये दमदार कामगिरी केल्यावर सुरेखा यांना कलर्सची सीरियल ‘बालिका वधू’मधून सर्वाधिक लोकप्रियता मिळाली. या शोमधील ‘दादी सा’च्या व्यक्तिरेखेने तिला उंचीवर नेले होते.
सुरेखा यांना पत्रकार व्हायचे होते
सुरेखा यांचे बालपणापासूनच एक स्वप्न होते की, त्या मोठी झाल्या की पत्रकार किंवा लेखक बनतील. पण नशिबाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. सुरेखा अलिगड मुस्लिम विद्यापीठात शिकत असताना, एकदा अब्राहम अल्काजी साहेब आपले एक नाटक घेऊन तिथे पोहचले. ‘द किंग लिअर’ असे या नाटकाचे नाव होते. या नाटकाचा सुरेखावर इतका प्रभाव पडला की, तिने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेण्याचा विचार केला.
एनएसडीमध्ये मिळवला प्रवेश
सुरेखा यांनी एनएसडीमध्ये प्रवेश घेण्यासाठी फॉर्मही आणला होता, परंतु कित्येक दिवस तो तसाच राहिला. त्यानंतर एकदा त्यांनी आईच्या सांगण्यावरून नशीब आजमावले. त्यांनी फॉर्म भरला, ऑडिशन दिले आणि 1965मध्ये त्यांची निवड देखील झाली. यानंतर या दिल्लीच्या मुलीने मागे वळून पाहिले नाही.
राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान
प्रत्येकाला तो क्षण आठवतो जेव्हा अभिनेत्री सुरेखा सिक्री यांना 66व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात ‘बधाई हो’ या चित्रपटातील दादीच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला. त्यांच्या कारकीर्दीतील हा विशेष पुरस्कार घेण्यासाठी जेव्हा सुरेखा सिक्री व्हीलचेयरवर आल्या, तेव्हा लोक उभे राहिले आणि त्यांनी तिच्याबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी टाळ्यांचा गडगडाट केला. हा क्षण सुरेखा यांच्यासाठी खूप खास होता.
कारकीर्द
अभिनेत्री सुरेखा सिक्री यांनी त्यांच्या कारकीर्दीत ‘किस्सा कुर्सी का’, सलीम लंगड़े पे मत रो’, ‘लिटिल बुद्धा’, ‘नसीम’, ‘सरदारी बेगम’, ‘सरफरोश’, ‘दिल्लगी’, ‘हरी-भरी’, ‘जुबैदा’, ‘मिस्टर अँड मिसेस अय्यर’, ‘रेनकोट’, ‘हमको दीवाना कर गए’, ‘देव डी’ आणि ‘बधाई हो’ अशा अनेक चित्रपटांमधून दमदार अभिनय केला होता.