राष्ट्रीय मतदार दिन साजरा करुन मतदार जागृतीची शपथ घ्यावी ; तहसीलदार विजय पाटील यांचे आवाहन
१८ वर्षांवरील युवक यांनी मतदार जागृतीची शपथ घ्यावी.
राष्ट्रीय मतदार दिन साजरा करुन मतदार जागृतीची शपथ घ्यावी ; तहसीलदार विजय पाटील यांचे आवाहन
१८ वर्षांवरील युवक यांनी मतदार जागृतीची शपथ घ्यावी.
बारामती वार्तापत्र
मतदारांमध्ये जागृती यावी आणि नवीन मतदार नोंदणी व्हावी यासाठी २५ जानेवारी रोजी तालुक्यातील प्रत्येक कार्यालयात, ग्रामपंचायतीमध्ये कोरोनाचे नियम पाळून राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात यावा, असे आवाहन तहसीलदार विजय पाटील यांनी केले आहे.
भारत निवडणूक आयोगाने १२ व्या राष्ट्रीय मतदार दिनासाठी ‘सर्वसमावेशक, सुलभ आणि सहभागपूर्ण निवडणूका’ अशी संकल्पना निश्चित केली आहे. राष्ट्रीय मतदार दिनाचे कार्यक्रम दूरदृष्य प्रणालीद्वारे साजरा करण्याचे प्रयत्न करावेत. कार्यक्रमांच्या माध्यमातून संकल्पनेविषयी माहिती देण्यात यावी. मतदार जागृतीसाठी नागरिकांना सहभागी करून घेण्यात यावे.
कोरोनाचे नियम पाळून सामान्य नागरिक, छात्रसैनिक, कर्मचारी, विद्यार्थी, विविध सामाजिक संघटना, संस्था, विभाग, १८ वर्षांवरील युवक यांनी मतदार जागृतीची शपथ घ्यावी. शपथ घेतानाची छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रदर्शित करावी. शाळांनी वक्तृत्व आणि निबंध स्पर्धा आभासी पद्धतीने (ऑनलाईन) घ्याव्यात. लोकशाहीला बळकट करण्यासाठी १८ वर्षांवरील युवकांनी मतदार यादीत नोंदणी करावी. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सहकार्याने मतदार दिनाचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवावा, असे श्री. पाटील यांनी कळविले आहे.