रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या मातोश्रींच्या स्मरणार्थ कार्यकर्त्यांकडून वृक्षारोपण
कार्यकर्त्यांकडून अनोख्या पध्दतीने श्रद्धांजली अर्पण

रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या मातोश्रींच्या स्मरणार्थ कार्यकर्त्यांकडून वृक्षारोपण
कार्यकर्त्यांकडून अनोख्या पध्दतीने श्रद्धांजली अर्पण
इंदापूर : प्रतिनिधी
रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या मातोश्री स्व.गुणाबाई जगन्नाथ जानकर यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून आज दि.९ रोजी तरंगवाडी परिसरात वृक्षारोपण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी बोलताना रासपचे पुणे जिल्हाध्यक्ष किरण गोफणे म्हणाले की, आमच्या आदरणीय व श्रद्धा स्थानी असणाऱ्या मातोश्रींच्या जाण्यामुळे समस्त राष्ट्रीय समाज परिवार दुःखी झाला आहे.वृक्षारोपणाच्या माध्यमातून स्व. गुणाबाई जानकर यांची आठवण सदैव राहील या जाणिवेतून आज वृक्षारोपण करण्यात आले.
इंदापूर तालुक्यातील राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी हे आपल्या घरी व परिसरात वृक्षारोपण करून स्व. गुणाबाई जानकर यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचे काम करत आहेत. तसेच पुढील वर्षभरात रासप च्या वतीने इंदापूर तालुक्यात ९ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प हाती घेण्यात आला आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष किरण गोफणे, तालुकाध्यक्ष सतीश शिंगाडे, आप्पा माने, गणेश हेगडकर, सतीश तरंगे, श्रीनिवास सातपुते, तानाजी मारकड,अविनाश मोहिते,अभिजित भाळे,तात्याराम मारकड,अविनाश मोहिते,कुलदीप वाघमोडे, सोनू जानकर, दादा मारकड इ.उपस्थित होते.