रिलायन्स मॉल ला वैधमापन शास्त्र खात्याचा दणका
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीकडे आलेल्या तक्रारीवरून घेतली दखल
रिलायन्स मॉल ला वैधमापन शास्त्र खात्याचा दणका
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीकडे आलेल्या तक्रारीवरून घेतली दखल
बारामती वार्तापत्र
सध्या दिवाळीच्या सणाची खरेदी धामधुमीत सुरू असून काही अपवाद वगळता दुकानदार अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करून ग्राहकांना नाडत आहेत वेगवेगळे विक्रीची प्रलोभने दाखवून ग्राहकांचा कसा फायदा आहे याचा भास निर्माण करत काही दुकानदार मालाची विक्री करत आहे
अशाच एका प्रकरणामध्ये अखिल भारतीय ग्राहक पंचायत इकडे रिलायन्स मॉल बारामती याबाबत तक्रारी आल्या होत्या त्याबाबतची पडताळणी करण्याकरता अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे पुणे जिल्हा संघटक ॲड तुषार झेंडे पाटील व दिलावर तांबोळी हे गेले असता त्यांना अवेष्टीत वस्तूच्या मूळ उत्पादित किंमतीवर स्टिकर लावून विक्री होत असल्याचे आढळले
संदर्भात ग्राहक पंचायतीकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या एमआरपी पेक्षा जास्त दराने विक्री MRP / किंमतीवर स्टिकर लावणे याबाबत वैधमापन शास्त्र यंत्रणेचे सहाय्यक नियंत्रक पुणे जिल्हा यांच्याशी संपर्क करून तात्काळ कारवाई करण्याबाबत त्यांना कळविल्यानंतर आज रोजी वैधमापण शास्त्र निरीक्षक बारामती यांना समक्ष घेऊन झेंडे पाटील यांनी रिलायन्स मॉल बारामती याठिकाणी तपासणी केली असता आवेस्टित वस्तू अधिनियमान्वये वस्तूवरील MRP बाबत संबंधित वस्तू दोषी आढळून आल्या तो माल जप्त केला असून त्याबाबत मेमो / तपासणी प्रतिवेदन रिलायन्स स्मार्ट बारामती चे मॅनेजर यांना दिला असून आठ दिवसांमध्ये दंड न भरल्यास बारामती न्यायालयात त्यांच्यावर खटला चालवला जाणार आहे..
अखील भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की दिवाळीच्या सणानिमित्ताने खरेदी करताना वस्तूचे एक्सपायरी डेट ,एम आर पी , खाडाखोड, स्टिकर चिटकवणे, इत्यादी बाबी आढळून आल्यास तात्काळ त्याचा आपल्या मोबाईल मध्ये फोटो काढून संबंधित दुकानाचा फोटो काढून बिलाचा फोटो काढून हे फोटो वैध मापन शास्त्र यंत्रणेचे राज्याचे मुख्यालय मुंबई या ठिकाणचा व्हाट्सअप नंबर 98 69 69 1666 यावर तक्रार पाठवावी तसेच ग्राहक पंचायतीच्या स्थानिक कार्यकर्त्यांना संपर्क करून ग्राहकांनी तक्रारी कराव्यात याबाबत तात्काळ कायदेशीर कारवाई केली जाईल.
तुषार झेंडे पाटील
संघटक ,अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुणे जिल्हा
सदस्य राज्य ग्राहक संरक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य