रुई मध्ये अडंरग्राऊंड वीज पुरवठा कामाचा शुभारंभ
अखंड पणे वीज पुरवठा रुईकराना होईल असे नगरसेविका सुरेखा चौधर यांनी सांगितले
रुई मध्ये अडंरग्राऊंड वीज पुरवठा कामाचा शुभारंभ
अखंड पणे वीज पुरवठा रुईकराना होईल असे नगरसेविका सुरेखा चौधर यांनी सांगितले
बारामती वार्तापत्र
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे संकल्पनेतुन गुरुवार 9 ऑक्टोबर रोजी बारामती नगरपरिषद वाढीव हद्दीतील रुई गावठाण येथे अडंरग्राऊंड वीज पुरवठा पद्धतीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी उपस्थित स्थानिक नगरसेविका सौ सुरेखा चौधर,सुनील पावडे,मुख्य अभियंता,चंद्रशेखर पाटील अधीक्षक अभियंता,गणेश लटपटे कार्यकारी अभियंता, धनंजय गावडे उप कार्यकारी अभियंता,मंगेश कानतोडे सहायक अभियंता ,आनंद सावंत वरिष्ठ तंत्रज्ञान, बालाजी एचवाड वरिष्ठ तंत्रज्ञान व रुई च्या माजी सरपंच शालन चौधर,तसेच राष्ट्रवादी चे नेते पांडुरंग चौधर , अजिनाथ चौधर, ज्ञानदेव साळुंके, राघु चौधर, गोरख चौधर, नितीन पानसरे, विशाल जगताप, आबा खाडे, लक्ष्मण चौधर,अजित साळुंके, सूरज चौधर इत्यादि मान्यवर उपस्थित होते.रुई मधील वीज वाहक तारा मुळे नागरिकांना होत असलेला त्रास आता या पुढे होणार नाही व महावितरण कडून सुरळीत पणे आणि अखंड पणे वीज पुरवठा रुईकराना होईल असे नगरसेविका सुरेखा चौधर यांनी सांगितले.