रुई मध्ये कोरोना सर्वेक्षणास प्रतिसाद.
अधिकारी व कर्मचारी यांची म्हतपूर्ण कामगिरी.
बारामती: वार्तापत्र
राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतुन `माझे कुटुंब, माझी जबाबदारी´ हे अभियान राबवले जात आहे. या अभियानांतर्गत आज रुई , बयाजीनगर , संत भगवान बाबा नगर , सिद्धिविनायक नगर , साई नगर इत्यादी परिसरात सर्वेक्षण करण्यात आले. त्यावेळी भैरवनाथ तरुण मंडळ , भैरवनाथ मित्र मंडळ , सिद्धिविनायक सेवा मंडळ यांनी या सर्वेक्षणात सहभाग घेत नागरीकांमध्ये जनजागृती केली.. त्याचबरोबर सध्याच्या कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभुमीवर काळजी घेण्याचे आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. या प्रसंगी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे,नगरसेवक किरण गुजर, स्थानिक नगरसेविका सुरेखा चौधर,तहसीलदार विजय पाटील,मुख्यधिकारी किरणराज यादव,विस्तार अधिकारी पी एस माकर, मंडल अधिकारी एस पी सय्यद, तलाठी प्रदीप चोरमले,महेश मेटे,गजानन पालवे,राष्ट्रवादी चे नेते पांडुरंग चौधर, नवनाथ चौधर,सुरज चौधर,अतुल कांबळे,गोरख चौधर, लक्ष्मण चौधर,बाळा चौधर,विशाल जगताप,लक्षण चौधर,अक्षय घाटे,नितीन पानसरे,आबा खाडे व इतर मान्यवर उपस्तीत होते.
आभार स्थानिक नगरसेविका सुरेखा चौधर यांनी मानले.