रुई येथील श्री बाबीर देवाची यात्रा यंदा रद्द; अनेक वर्षापासूनची परंपरा खंडित
ट्रस्टचे अध्यक्ष व पोलिस अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत निर्णय
रुई येथील श्री बाबीर देवाची यात्रा यंदा रद्द; अनेक वर्षापासूनची परंपरा खंडित
ट्रस्टचे अध्यक्ष व पोलिस अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत निर्णय
इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
जागतिक संसर्गजन्य कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून चालू वर्षी १६ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर रोजी होणारी श्री बाबीर देवाची यात्रा यंदा रद्द करण्यात आली आहे.
दीपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु होऊन तीन दिवस भरणारी श्री बाबीर देवाची यात्रा ट्रस्टचे अध्यक्ष अजित सिंह पाटील, वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार व प्रमुख पुजारी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत यात्रा यंदा रद्द करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे.
महाराष्ट्रासह,आंध्रप्रदेश, कर्नाटक, व इतर राज्यातून लाखो भाविक दरवर्षी रुई येथे श्री बाबीर देवाच्या दर्शनासाठी येत असतात.मात्र मोठ्या उत्साहात संपन्न होणारी यात्रा यंदा खंडित झाल्याने भाविकांमध्ये काही प्रमाणात निराशा पहावयास मिळत आहे.