कोरोंना विशेष
रुग्णवाढीवर अंकुश लावण्यासाठी ,मुख्यमंत्र्यांनी बोलवली टास्क फोर्स समितीची बैठक
यामध्ये आरोग्य विभागचे अधिकारी सुद्धा उपस्थित राहणार आहेत.
रुग्णवाढीवर अंकुश लावण्यासाठी ,मुख्यमंत्र्यांनी बोलवली टास्क फोर्स समितीची बैठक
यामध्ये आरोग्य विभागचे अधिकारी सुद्धा उपस्थित राहणार आहेत.
मुंबई : प्रतिनिधी
राज्यात दिवसेंदिवस कोरोना आणि ओमाक्रॉनच्या रुग्णात वाढ होत आहे. ही वाढ दर दिवसाला मोठ्या प्रमाणात होत आहे. राज्य सरकार आणि आरोग्य प्रशासन गडबडून जागे झाले आहे. या वाढत्या रुग्णवाढीवर अंकुश लावण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टाक्स फोर्स समितीची बैठक बोलवली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बोलावलेली टाक्स फोर्स समितीची बैठक दुपारी तीन वाजता होणार आहे. ही बैठक ऑनलाइन पद्धतीने पार पडणार आहे. या बैठकीत टास्क फोर्स ( Task Force Committee ), वैद्यकीय विभागाचे अधिकारी आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. बैठकीत राज्यातील एकंदरीत रुग्ण संख्येचा आढावा घेतला जाणार आहे.