स्थानिक

रुग्ण सेवा हीच ईश्वरसेवा :बारामतीतील डॉ विशाल मेहता

मेहता हॉस्पिटलच्या रोग तपासणी उपचार शिबिरास रुग्णाचा प्रतिसाद

रुग्ण सेवा हीच ईश्वरसेवा :बारामतीतील डॉ विशाल मेहता

मेहता हॉस्पिटलच्या रोग तपासणी उपचार शिबिरास रुग्णाचा प्रतिसाद

बारामती वार्तापत्र 

रुग्णांचा वेळ आणि पैसा वाचावा सर्व सुविधा एकाच छताखाली मिळाव्यात मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज पडू नये आणि वेळेत उपचार मिळावेत व रुग्ण लवकर बरा व्याहवा यासाठी मेहता हॉस्पिटल कटिबद्ध असून रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा समजून कार्य करत असल्याचे प्रतिपादन मेहता मेडिकेअर मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल अँड आयसीयू चे चेअरमन डॉ विशाल मेहता यांनी केले.

मेहता हॉस्पिटल च्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्त मोफत सर्व रोग तपासणी व उपचार शिबिर चे आयोजन करण्यात आले आहे या प्रसंगी डॉ मेहता बोलत होते या प्रसंगी बारामती नगर परिषदेचे मा. नगरसेवक अतुल बालगुडे,सौ आशा माने, पुणे जिल्हा राष्ट्रीवादीचे उपाध्यक्ष प्रताप पागळे,मेडिकोज गिल्ड चे अध्यक्ष डॉ राजेंद्र चोपडे, जलोची ग्रामपंचायतचे मा सरपंच दत्तात्रेय माने, माधव मलगुंडे, योगेश ओमासे,राहुल वायसे, अमोल पवार, शेखर सातकर, बाळासो सांगळे व मेहता हॉस्पिटल चे डॉ चेतन देवकाते,डॉ सुनील ढाके, डॉ शैलेंद्र ठवरे,सागर मेहता, व्यवस्थापक अमर भोसले व इतर मान्यवर उपस्तीत होते.

गरीब, मध्यमवर्गीय व अति महत्त्वाच्या रुग्णांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने सर्व सेवा आणि सुविधा व त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले योजना व मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत लाभ मिळावेत ही प्रामाणिक भूमिका असून लवकरच अत्याधुनिक डायलिसिस सेंटर सुरू करणार असून रुग्णांनी याचा फायदा घ्यावा असे आव्हान डॉ विशाल मेहता यांनी केले.

मेहता हॉस्पिटल च्या अंतर्गत विविध आजारावर दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधा व विविध विभाग यांची माहिती व्यवस्थापक अमर भोसले यांनी दिली सूत्रसंचालन श्री सावळेपाटील यांनी केले तर आभार सागर मेहता यांनी मांडले.

Related Articles

Back to top button