
भारतीय बौद्ध महासभा तालुका व शहर कार्यकारिणीची फेरनिवड
खेळीमेळीच्या वातावरणात बैठक संपन्न
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर शहरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनमध्ये भारतीय बौद्ध महासभा तालुका व शहर नवीन कार्यकारिणी निवड करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. इंदापूर तालुक्यातील सर्व श्रामनेर, बौध्दाचार्य, केंद्रीय शिक्षक तथा विद्यमान सर्व पदाधिकारी तसेच इच्छुक पदाधिकारी यांना बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन पुणे जिल्हा (पूर्व) अध्यक्ष रघुनाथ साळवे यांनी केले होते.
प्रथम मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुर्वीची कार्यकारिणी बरखास्त करीत असल्याचे वरिष्ठांनी सूचित केले. कोरोना कालावधीत या कार्यकारिणीने उत्कृष्ट कामकाज केल्याने सर्वानुमते पूर्वीच्या कार्यकारिणीची फेरनिवड करण्यात आली. बौध्दाचार्य बाळासाहेब सरवदे यांची इंदापूर तालुका सांस्कृतिक विभाग प्रमुखपदी एकमेव निवड करण्यात आली.या बैठकीस महाराष्ट्र राज्य विभागीय सचिव दिलीप सरोदे, पुणे जिल्हा पूर्व अध्यक्ष रघुनाथ साळवे, सरचिटणीस पुणे जिल्हा पूर्व राजरतन थोरात, कोषाध्यक्ष व इंदापूर तालुका पालकमंत्री ॲड. सुधाकर सरदार इत्यादी प्रमुख अतिथी उपस्थित होते.
यावेळी इंदापूर तालुकाध्यक्ष डाॅ. जीवन सरवदे, इंदापूर तालुका सरचिटणीस प्रा. श्रीनिवास शिंदे, इंदापूर तालुका कोषाध्यक्ष हनुमंत कांबळे, शहराध्यक्ष सुधीर मखरे, आरपीआयचे पुणे जिल्हा संघटक-सचिव शिवाजीराव मखरे, आरपीआय तालुकाध्यक्ष संदिपान कडवळे, आरपीआय बारामती लोकसभा मतदार संघाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब सरवदे, नगरसेविका राजश्री मखरे, प्रा.बाळासाहेब मखरे, प्रा.अशोक मखरे, प्रा.नवनाथ चंदनशिवे, प्रा.तानाजी कसबे, प्रा.संजय बल्लाळ, राजेंद्र चव्हाण,मागासवर्गीय प्राथमिक शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुहास मोरे, सुनिल मखरे, मुख्याध्यापक शशिकांत मखरे, रविंद्र चव्हाण, विनय मखरे, दादासाहेब किर्ते, अनिल साबळे, आनंद मखरे, प्रा. मयूर मखरे इत्यादी उपस्थित होते.भारतीय बौद्ध महासभा इंदापूर शहर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.