पुणे

रेशनकार्डला आधार क्रमांक लिंक न केल्‍या 1 फेब्रुवारीपासुन रेशन बंद

सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेत अधिक पारदर्शकता येण्‍यासाठी मोहिम राबवुन लाभार्थ्‍यांचे आधार

रेशनकार्डला आधार क्रमांक लिंक न केल्‍या 1 फेब्रुवारीपासुन रेशन बंद

सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेत अधिक पारदर्शकता येण्‍यासाठी मोहिम राबवुन लाभार्थ्‍यांचे आधार

पुणे :- बारामती वार्तापत्र रिपोर्ट

राष्‍ट्रीय अन्‍नसुरक्षा योजना व अंत्‍योदय अन्‍नयोजनेतील शिधापत्रिकेतील सर्व लाभार्थ्‍यांचे मोबाईल क्रमांक व आधार सिडींग 100 टक्के पूर्ण करण्‍याच्‍या केंद्र शासनाच्‍या सूचना आहेत. राष्‍ट्रीय अन्‍नसुरक्षा योजना व अंत्‍योदय अन्‍नयोजनेचे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात एकुण 13 लाख 32 हजार 871 इतके लाभार्थी असून 10 लाख 61 हजार 822 ( 79.66%) इतक्‍या लाभार्थ्‍यांचे आधार सिडींग झालेले आहे.

सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेत अधिक पारदर्शकता येण्‍यासाठी मोहिम राबवुन लाभार्थ्‍यांचे आधार, मोबाईल सिडींग सुधारणे आवश्‍यक आहे. याकरीता रास्‍तभाव दुकानांतील ई-पॉस उपकरणांमधील eKYC व मोबाईल सिडींग सुविधेचा अधिकतम वापर करुन आधार व मोबाईल क्रमांक सिडींगचे प्रमाण वाढविणे आवश्‍यक आहे. याकरिता दि 31 जानेवारी 2021 पूर्वी प्रत्‍येक रेशनकार्डमधील लाभार्थ्‍यांचे 100 टक्के आधार सिडींग आणि किमान एक वैध मोबाईल क्रमांक सिड करण्‍याच्‍या उद्दीष्‍टाने पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील 11 परिमंडळ कार्यालयात मोहिम राबविणेत येत आहे. त्‍याअनुषंगाने धान्‍याचे मासिक वाटप करतेवेळी ई-पॉस उपकरणाव्‍दारे रास्‍तभाव दुकानदार यांच्‍यामार्फत शिधापत्रिकेतील लाभार्थ्‍यांच्‍या आधार व मोबाईल क्रमांकाचे सिडींग करण्‍यात येणार आहे. याबाबत आधारसिडींग न झालेल्‍या लाभार्थ्‍यांची रास्‍तभाव दुकाननिहाय यादी तयार करण्यात आलेली असुन दि. 31 जानेवारी 2021 पुर्वी या लाभार्थ्‍यांचे आधार व मोबाईल क्रमांक सिडींग करण्‍याचे निर्देश 11 परिमंडळ कार्यालयांना देणेत आलेले आहेत.

eKYC पडताळणी व मोबाईल सिडींग सुविधा प्रत्‍येक रास्‍तभाव धान्‍य दुकानात व संबंधित परिमंडळ कार्यालयात उपलब्‍ध असुन याबाबत दि. 28 डिसेंबर 2020 रोजी सर्व परिमंडळ अधिकारी व पुरवठा निरीक्षक यांना प्रशिक्षण देणेत आले असुन परिमंडळ अधिकारी व पुरवठा निरीक्षक यांचेमार्फत रास्‍तभाव दुकानदार यांना प्रशिक्षण देणेत आले आहे.

तरी याव्‍दारे सर्व लाभार्थ्‍यांना सूचित करणेत येते की, रेशनकार्डमध्‍ये नोंद असलेल्‍या कुंटुंबातील सर्व सदस्‍यांचे आधारकार्ड घेऊन संबंधित रास्‍तभाव धान्‍य दुकानात जावुन eKYC पडताळणी पूर्ण करुन घ्‍यावी. याकरिता संबंधित लाभार्थी यांनी वैयक्तिकरित्‍या दुकानात जाऊन आधारकार्ड व अंगठयाचा ठसा POS मशिनवर दयावयाचा आहे. eKYC करताना कुंटुंबातील किमान एका सदस्‍याचा चालू मोबाईल क्रमांक देणे आवश्‍यक आहे. सदर eKYC दि. 31 जानेवारी 2021 पर्यंत करुन घेणे बंधनकारक असुन 31 जानेवारी 2021 पर्यंत आधारसिडींग न झालेस सदर लाभार्थ्‍यांना अनुज्ञेय धान्‍य पुढील महिन्‍यापासून निलंबित करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्‍यावी, असे पुणे अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!