रेशनिग दुकानदारावर महसूल विभागाच्या कारवाई.
तालुक्यातील मुढाळे येथे कारवाई.
बारामती:वार्तापत्र
बारामती तालुक्यातील मूढाळे येथे रेशनिंगच्या धान्याचा काळा बाजार करून खुल्या बाजारात विक्री करण्यासाठी गहू साठवून ठेवल्या प्रकरणी बारामतीचे तहसीलदार विजय पाटील यांच्या आदेशानुसार रेशनिंग चालकावर कारवाई करून वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, आरोपी गोकुळ रामचंद्र पवार (रा. भिलारवाडी ता.बारामती) असे कारवाई करण्यात आलेल्या रेशनिंग
चालकाचे नाव आहे, याबाबत तलाठी सुरेश जगताप यांनी फिर्याद दिली आहे, सोमवार (दि. ६) रोजी इसम शिवाजी रामचंद्र बोबडे (रा. मूढाळे ता. बारामती),
यांच्या मालकीच्या मंगल कार्यालयातील उघड्या पत्र्याच्याशेड मध्ये ३१ गव्हाणे भरलेल्या पिशव्या ठेवण्यात आल्या आहेत अशी खात्रीशीर माहिती
तलाठी सुरेश जगताप यांना मिळाली होती,रेशनिंगचा अपहार होत असल्याबाबतची तक्रार बारामतीचे तहसीलदार विजय पाटील यांना तलाठी
जगताप यांनी दिली, त्यानुसार तहसीलदार विजय पाटील यांनी मंडालाधिकारी, तलाठी यांना प्रत्यक्ष पहाणी करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते, त्यानुसार बारामतीचे नायब तहसीलदार महादेव भोसले, लोणीभापकरचे मंडलाधिकारी धनसिंग कोरपड, मूढाळे गावचे तलाठी सुरेश जगताप,पोलीस पाटील संतोष गायकवाड, तलाठी लोणीभापकर व्ही.एम.शिंदे, तलाठी कार्हाठी सुनील भुसेवाड,क-हावागजचे तलाठी बाळासाहेब वनवे, कोतवाल राहुल पोमणे यांनी घटनास्थळी जाऊन रेशनिंगचा
माल असल्याची खात्री करून घेतली,त्यानंतर शिवाजी रामचंद्र बोबडे यांच्या नवीन बांधकाम सुरु असलेल्या मंगल कार्यालयाच्या इमारती जवळ दुपारी ३ वाजून ४५ मिनिटांनी सर्वजण गेले,त्यावेळी शिवाजी रामचंद्र बोबडे हे त्याठिकाणी हजर होते, त्यांच्याकडे चौकशी केली असता सदर रेशनिंगचा गहू हा इसम गोकुळ रामचंद्र पवार स्वस्त धन्य दुकानदार भिलारवाडी (ता. बारामती) यांचा असून, त्यांनी चार ते पाच दिवसांपासून दररोज ५ ते ६
पिशव्या आणून ठेवत होता, असे सांगण्यात आले,त्यानंतर एकूण ३१ पोती गहू भरलेला दिसला, सदर मालाची तपासणी नायब – पीलदार भोसले यांनी
केली, त्यावेळी ४० हजार ३०० रुपये किमतीची २० क्विंटल गव्हाची पोती आढळून आली, त्यानुसार पहाणी दरम्यान अपहार करण्यासाठी राखून
ठेवण्यात आलेल्या गहूच्या पोत्यांचा साठा आढळून आला, त्यावेळी रेशनिंग चालक पवार याला सदर ठिकाणी बोलाऊन घेतले असता रेशनिंगचा माल
असल्याचे त्याने कबुली दिली, यावेळी सर्व माल जप्त करून मुढाळे येथील तलाठी कार्यालयात ठेवण्यात आला आहे, नायब तहसीलदार महादेव भोसले,
लोणीभापकरचे मांडलाधिकारी धनसिंग कोरपड,मूढाळे गावचे तलाठी सुरेश जगताप,पोलीस पाटील संतोष गायकवाड, तलाठी लोणीभापकर व्ही.एम.शिंदे, तलाठी कार्हाटी सुनील भुसेवाड,क-हावागज तलाठी बाळासाहेब वनवे, कोतवाल राहुल पोमणे यांनी हि कारवाई केली आहे.
.