रेशन वाटपाच्या तक्रारीत पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यात व्यक्तीश लक्ष द्यावेत

कोरोना संकट काळात गोरगरीबाला रेशन दुकानांमार्फत धान्यवाटपाचं प्रमाण वाढवलंय. यात गैरप्रकार टाळून वाटप विनातक्रार व्हावं, तक्रार आल्यास तत्काळ निराकरण व शासनाची विनाकारण होणारी बदनामी टाळण्यासाठी सर्व पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यात व्यक्तीश: लक्ष देण्याचं आवाहन पत्राद्वारे केलं. राज्यातील रेशनिंगवरील अन्नधान्याचा कोटा ३.८७ लाख मेट्रीक टनांवरून ७.७४ लाख मेट्रीक टनांवर नेण्यात आला आहे. केसरी कार्डधारकांना १.५२ लाख मेट्रीक टनांचं अतिरिक्त धान्य उपलब्ध करून देण्यात आलं आहे. या नाजूक स्थितीत शासकीय यंत्रणा सर्व स्तरावर उत्तम काम करत आहेत, ही बाब कौतुकास्पद आहे. राज्य अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून ७ कोटी नागरिकांना तीन महिन्यांसाठी २ रु. प्रतिकिलो दराने गहू, ३ रु.प्रतिकिलो दराने तांदूळ रेशन दुकानांवर दिला जातोय. केंद्र सरकारकडून ५ किलो मोफत तांदळाचं वाटपही सुरू आहे. केशरी कार्डधारकांना ८ रु. प्रतिकिलो दराने गहू, १२ रु. प्रतिकिलो दराने तांदूळ वाटपाचा निर्णय घेतलाय. जिल्ह्यांमधून येणाऱ्या तक्रारींमुळे शिधावाटप यंत्रणेची, शासनाची नाहक बदनामी होत आहे. शिधावाटप यंत्रणेसंदर्भातील सूचना व तक्रारींसाठी राज्य शासनानं राज्य स्तरावर १८००२२४९५० आणि १९६७ हे टोल-फ्री दूरध्वनी क्रमांक दिले आहेत. त्यावर संपर्क साधून सूचना द्याव्यात, तक्रारी दूर कराव्यात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!