रोटरी क्लब चे कार्य कौतुकास्पद:अजित पवार [उपमुख्यमंत्री.]
वैदकीय अधिकारी,कर्मचारी साठी पीपीई किट उपलब्ध.
रोटरी क्लब चे कार्य कौतुकास्पद:अजित पवार.
वैदकीय अधिकारी,कर्मचारी साठी पीपीई किट उपलब्ध.
बारामती वार्तापत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष
प्रयत्नातून बारामतीत सुरू झालेल्या कोविड केअर सेंटरच्या पायाभूत सुविधांसाठी रोटरी क्लब ऑफ बारामती व पुणे सेंट्रलच्या संयुक्त विद्यमाने आपले योगदान दिले. आज रोटरी क्लबच्या वतीने येथील कोरोना कक्षात कार्यरत वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व कर्मचाऱ्यांसाठी ६५ हजार रुपये किंमतीची पीपीई किट वितरीत करण्यात आली.
कोरोनाविरोधात प्रशासन, अधिकारी, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस व सफाई
कामगार लढत आहेत. या लढ्याला साथ देण्यासाठी राज्य शासनाने आवाहन केले
होते. त्या आवाहनास प्रतिसाद देत आज रोटरी क्लबने बारामतीत आंतरराष्ट्रीय वैद्यकीय मानके पूर्ण करणारी उच्च प्रतीची ६५ पीपीई किट दवाखान्यास उपलब्ध करून दिली. उपमुख्यमत्री अजित पवार यांच्या हस्ते ही किट दवाखान्याकडे सुपूर्त करण्यात आली. यावेळी रोटरी क्लब ऑफ बारामती चे अध्यक्ष व शहरातील सीए प्रतीक दोशी. सचिव पार्श्वेन्द्र फरसोले यांच्यासह रोटरी क्लब ऑफ बारामतीचे सदस्य उपस्थित होते. या उपक्रमाचे अजित पवार यांनी कौतुक करीत सामाजिक संघटनांनी संकटाच्या काळात अशीच सामाजिक बांधलकी दाखवून योगदान द्यावे असे आवाहन केले.
रोटरी क्लब चे माजी अध्यक्ष व बांधकाम व्यवसाईक किशोर शंकर मेहता यांनी 51 हजार रुपये चा धनादेश कोविड सेन्टर च्या मदतीसाठी अजित पवार यांच्या हस्ते दिला.