रोहिणी तावरे यांच्या माध्यमातून पीठ गिरणी उपलब्ध.
५०% सवलत मध्ये पीठ गिरणी .
बारामती:वार्तापत्र
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांच्या 61 व्या वाढदिवसा निमित्ताने माळेगाव पणदरे गटा मध्ये जिल्हा परिषद सदस्या सौ रोहिणी रविराज तावरे(लाखे)यांच्या माध्यमातून ६५०० सर्वसामान्य लोकांना ५०%सवलतीच्या दरात घरगुती पीठ गिरणी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.या गिरण्या iso प्रमाणित कंपनी च्या असून २ वर्षे वोरंटी आहे.त्यामुळे लोकांची एक जीवनावश्यक गरज या माध्यमातून पूर्ण होत आहे.कोरोना मध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या महिला पोलीस कॉन्स्टेबल,आशा वर्कर,अंगणवाडी सेविका यांना आज गिरणी वाटप जिल्हा परिषद सदस्या रोहिणी रविराज तावरे(लाखे),माजी सरपंच दिपक बापू तावरे,कल्याण पाचांगणे, नितीन तावरे,रविराज तावरे यांच्या हस्ते व केतन घुले,आशिष कोकरे,सुरज हिवरकर,बापू सस्ते,संतोष जाधव,संतोष भिसे,अक्षय कोकरे यांच्या उपस्थिती त करून 500 चा टप्पा पार करण्यात आला.