स्थानिक
लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर बलात्कार.
दर घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर करीत आहे.
लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर बलात्कार
लग्नाचे आमिष दाखवून एका २० वर्षीय युवतीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका तरुणावर तर जातीवाचक बोलल्या प्रकरणी त्याच्या आईवर बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौरभ बाळासो आटोळे, भिमाबाई बाळासो आटोळे ( दोघे. रा. गोजुबावी ता. बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
सदर घटनेची हकीकत अशी की, आरोपी सौरभ आटोळे याने लग्नाचे आमिष दाखवून २८ मार्च ते ११ जुलै दरम्यान गोजुबावी येथे फिर्यादीच्या मामाच्या घरी व बारामती भिगवण रोडवरील टोलनाक्याच्या पुढील एका लॉजवरती शारीरिक संबंध ठेवल्याचे तसेच आरोपी सौरभ आटोळे याची आई भिमाबाई आटोळे हिने जातिवाचक बोलल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
सदर घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर करीत आहे.