लग्न कराताय तर सावधान…! नियमापेक्षा जास्त पाहुणे असतील तर आपणावर होउ शकते कारवाई..
विवाहाचे नियम न पाळलयास कारवाई करू: प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे.
विवाहाचे नियम न पाळलयास कारवाई करू: प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे.
प्रशासनाचे व हॉल मालकाचे दुर्लक्ष?
बारामती:वार्तापत्र लॉकडाऊन च्या काळात विवाह सोहळे संपन्न व्हावेत नागरिकांची गैरसोय होऊ नये त्यासाठी शासनाने नियम घालून दिले आहेत परंतु नियम धाब्यावर बसवून शानदार विवाह सोहळे चालू आहेत मात्र प्रशासन माहीत नसल्याचे सांगत आहे त्यामुळे नियम कोणी पाळायचे व त्या गर्दीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यास व त्याच्या पासून संसर्ग वाढल्यास त्यास जवाबदार कोण? असा सवाल आता नागरिक करीत आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विवाह सोहळे साजरे करताना वधूपक्षांकडील पंचवीस नातेवाईक व वर पक्षांकडील पंचवीस नातेवाईक असे मिळून एकूण पन्नास व्यक्ती यांची उपस्थिती पाहिजे,विवाह सोहळे शक्यतो मोकळ्या जागेत असावेत,सोशल डिस्टन्स पाळले जावे आदी नियम विवाह सोहळा साठी
फक्त लॉकडाउन च्या काळात शासनाने घालून दिले आहे परंतु
विवाह सोहळे होताना आता मोकळ्या जागे ऐवजी नामांकित हॉटेल च्या बंदिस्त हॉल मध्ये चारशे,किंवा पाचशे लोकांच्या उपस्तीत संपन्न होत आहेत फक्त वाजंत्री(डी जे सिस्टिम,बँड ) नसतात त्यामुळे कोणास विवाह आहे हे कळत नाही जेवणाच्या शाही पंकत होतात,फोटो ,व्हिडीओ शुटींग,आदी सर्व होते तरीही स्थानिक प्रशासन यांना माहीत होतं नाही व माहित झाले तरी दुर्लक्ष केले जाते.
एखादा विवाह सोहळा आशा प्रकारे यशस्वी झाल्यावर अनेकजण हा आदर्श घेऊन इतर नागरिक विवाह सोहळा साठी तो हॉल बुक करतात.
बंदिस्त हॉल असल्याने व बँड किंवा वाजंत्री नसल्याने बाहेरच्या कोणासही विवाह असल्याचे कळत नाही फक्त निमंत्रित नातेवाईक,पाहुणे,मित्र परिवार व हॉटेल चे कर्मचारी यांना याची कल्पना असते सोशल मीडियावर विवाह पत्रिका पाठविल्या जातात दोन्ही पक्षांकडील पन्नास नातेवाइक म्हणून विवाह सोहळा सुरू झाल्यावर चारशे तर पाचशे लोक प्रत्येक्ष उपस्तीत असतात सॅनिटायझर नाही,मास्क नाही सोशल डिस्टन्स पाळले जात नाही त्या मुळे आशा विवाह सोहळ्यातून जर कदाचित कोरोना संसर्ग वाढला तर त्यास जवाबदार कोण? प्रशासन ?
आयोजक ? हॉटेल चालक? असा सवाल उपस्तीत केला जात आहे.
हॉटेल चालकास हॉल भाडे,जेवणाची ऑर्डर मिळाली की त्यांचे काम झाले पन्नास पेक्षा जास्त लोक उपस्तीत राहिले तर ताटावर जेवणाचे पैसे असल्याने फायदा हॉटेल चालकाचा त्यामुळे लॉकडाऊन च्या काळात हॉटेल चालक हॉल लग्नकार्यासाठी देऊन पैसा कमवतात परंतु नियमावली पाळण्यासाठी कटिबद्ध राहत नाही.
दोन्ही पक्षकडील ज्येष्ठ मंडळी स्थानिक प्रशासन कडून पन्नास नातेवाईक उपस्तीत राहणार म्हणून परवानगी घेतात. विवाह सोहळ्यात हॉल मध्ये गर्दी होते त्यामुळे कोरोना संसर्ग ची भीती जास्त असते त्यामुळे अशा प्रकारे दोन्ही पक्षा कडील लोकांनी व हॉटेल चालकांनी प्रशासनाची फसवणूक करू नये व स्वतः सुद्धा फसू नये अन्यथा कोरोनाची किंमत मोजावी लागेल हे नक्की
हॉटेल मालकाचे मत
पन्नास लोकांसाठी परवानगी दिल्यावर आयोजकांनी जास्त लोक विवाह साठी येऊ नयेत याची काळजी घ्यावी हॉटेल प्रशासन पन्नास पेक्षा जास्त झालेल्या नातेवाईकास हॉल च्या बाहेर काढू शकत नाही किंवा हॉल मध्ये येण्यास आडवू शकत नाही ही सर्वस्वी जवाबदारी आयोजकांनी आहे असे मत विविध हॉटेल व हॉल च्या चालकांनी सांगितले.
अन्यथा कारवाई करू: प्रांताधिकारी
बंदिस्त हॉल मध्ये पन्नास पेक्षा जास्त लोक लोक एकत्र येऊन विवाह संपन्न व जेवणावळी करत असतील तर प्रशासन कारवाई करेल असा इशारा बारामती चे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिला.