राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
मलिक यांच्यावर झालेले आरोप निखालस खोटे असल्याचा दावा मलिक यांच्या कुटुंबीयांनी आणि राष्ट्रवादीने केला आहे.

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
मलिक यांच्यावर झालेले आरोप निखालस खोटे असल्याचा दावा मलिक यांच्या कुटुंबीयांनी आणि राष्ट्रवादीने केला आहे.
मुंबई:प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना आजही दिलासा मिळू शकला नाही. मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत १८ एप्रिल पर्यंत वाढ करण्यात आली आहे. आता PMLA कोर्टाने त्यांच्या कोठडीत आणखी वाढ केली आहे.त्यामुळे मलिक यांना रमजान काळात कोठडीत राहावं लागणार आहे. नवाब मलिक यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
दाऊद इब्राहिम मनी लॉड्रिंग प्रकरणी २३ फेब्रुवारी २०२२ रोजी नवाब मलिक यांची ईडी कार्यालयात आठ तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर मलिक यांना अटक केली होती. त्यांना न्यायालयात हजर केले असता ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. यानंतरही सत्र न्यायालयाने त्यांच्या न्यायालयाने कोठडीत ४ एप्रिलपर्यंत वाढ केली होती. आता पुन्हा त्यांच्या कोठडीत १८ एप्रिल पर्यंत वाढ करण्यात आली आहे.
मलिकांवरील आरोप काय?
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. दाऊद टोळीशी संबंधित व्यक्तीकडून जमीन खरेदीचा व्यवहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यामुळे मलिक यांच्या घरावर ईडीने धाड मारली होती. त्यानंतर त्यांना 23 फेब्रुवारी रोजी ईडीने अटक केली होती. त्यानंतर त्यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी करण्यात आली असता त्यांना 7 मार्चपर्यंत कोठडी सुनावली होती. आता 18 एप्रिलपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.