पुणे

लग्न समारंभात 50 पेक्षा जास्त नागरिक नको, अन्यथा कडक कारवाई! पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांचा इशारा

नागरिकांनी 50 पेक्षा जास्त नागरिकांना आमंत्रित करू नये

लग्न समारंभात 50 पेक्षा जास्त नागरिक नको, अन्यथा कडक कारवाई! पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांचा इशारा

नागरिकांनी 50 पेक्षा जास्त नागरिकांना आमंत्रित करू नये

बारामती वार्तापत्र

पुणे जिल्ह्यातील वाढत्या कोरोनामुळे नागरिकांनी स्वयंशिस्त बाळगून खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. त्याशिवाय नियमभंग करणाऱ्याविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. अनेकांकडून कोरोनाची खबरदारी घेतली जात नसल्यानेच संसर्ग वाढला आहे. त्यामुळे आता गावोगावी लग्न आणि इतर समारंभात 50 पेक्षा जास्त नागरिकांना आमंत्रित करणाऱ्याना पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

पुणे ग्रामीण पोलिसांचे आवाहन

लग्न समारंभ करीत असताना 50 पेक्षा जास्त नागरिक नकोच लग्न समारंभात सोशल डिस्टन्स, सॅनिटायझरचा वापर, मास्क वापरणे बंधनकारक आहे मंगल कार्यालय व्यवस्थापकाने संबंधित लग्नात येणाऱ्या नागरिकांची यादी बाळगणे आवश्यक बेकायदेशीर गर्दी, जमाव होऊ न देणे

कोरोना नियमावलीचे झाल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्न समारंभासह इतर कार्यक्रमात नागरिकांनी 50 पेक्षा जास्त नागरिकांना आमंत्रित करू नये. अन्यथा कडक कारवाई केली जाणार आहे. सोशल डिस्टन्स बाळगून कार्यक्रम संपन्न करणे संबंधीतांची जबाबदारी आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास मंगल कार्यालय व्यवस्थापकासह इतरांनाही जबाबदार धरण्यात येईल. नागरिकांनी स्वयंशिस्त बाळगून पोलिसांना सहकार्य करावे.

– डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!