लहान मुलांमध्ये शेतकऱ्यांप्रती आदर निर्माण करावा : अंगद शहा
शहा ग्लोबल स्कूलमध्ये चिमुकल्यांचा आनंद बाजार : ग्लोबल स्कूलमध्ये राष्ट्रीय शेतकरी दिन उत्साहात साजरा

लहान मुलांमध्ये शेतकऱ्यांप्रती आदर निर्माण करावा : अंगद शहा
शहा ग्लोबल स्कूलमध्ये चिमुकल्यांचा आनंद बाजार : ग्लोबल स्कूलमध्ये राष्ट्रीय शेतकरी दिन उत्साहात साजरा
इंदापूर प्रतिनिधी –
भारत हा कृषिप्रधान देश आहे. आपला देश शेतकऱ्यांच्या जीवावर चालतो हा इतिहास आहे. देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी, बळीराजा महत्त्वाचा घटक आहे. याच बळीराजा विषयी, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आदर निर्माण व्हावा. यासाठी पालकांनी लहान मुलांमध्ये शेतकऱ्यांप्रती आदर निर्माण करावा. असे आवाहन, शहा ग्लोबल स्कूलचे व्यवस्थापकीय संचालक तथा आदर्श युवा शेतकरी अंगद मुकुंद शहा यांनी केले.
इंदापूर शहरातील शहा ग्लोबल स्कूल मध्ये राष्ट्रीय शेतकरी दिनाचे औचित्य साधून, सोमवार ( दि. 23 डिसेंबर ) रोजी, शहा ग्लोबल स्कूलच्या चिमुकल्यांसाठी आनंद बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांच्या आनंद बाजाराचे उद्घाटन शेतकरी शशांक भोंग यांच्या हस्ते करण्यात आले वं राष्ट्रीय शेतकरी दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी शहा ग्लोबल स्कूलचे संचालक मुकुंद शेठ शहा, इंदापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा, शहा चॅरिटेबल ट्रस्टच्या विश्वस्त वैशाली भरत शहा, शहा ग्लोबल स्कूलच्या संचालिका रुचिरा अंगद शहा, स्कूल मधील विद्यार्थ्यांचे पालक यांनी आनंद बाजारात भाजीपाला खरेदी करून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद खुलवला. तर विद्यार्थ्यांनी देखील विविध प्रकारचा ताजा आणि हिरवा भाजीपाला, आनंद बाजारात विक्रीसाठी आणला होता.
पुढे बोलताना अंगद शहा म्हणाले की, जागतिक स्तरावर शेतकऱ्याला विशेष महत्त्व आहे. ग्लोबल स्कूल असले तरी, विद्यार्थ्यांना पालेभाज्यांची माहिती मिळावी तसेच विद्यार्थ्यांना मार्केटमधील संवाद कौशल्य आत्मसात व्हावेत. विद्यार्थ्यांना इतर पालकांशी देखील सुसंवाद साधता आला पाहिजे आणि त्यांच्यावर देखील संवाद संस्कार झाले पाहिजेत. म्हणून राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या औचित्य साधून, विद्यार्थ्यांचा आनंद बाजार भरवण्यात आला होता.
या आनंद बाजारामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांच्या अनेक पालकांनी सहभागी होत आनंद बाजारातील भाजीपाला, खरेदी केला. यामध्ये आठवडी बाजारात मिळणारा सर्व भाजीपाला, विद्यार्थ्यांनी विक्रीस आणला होता. भाजी घ्या भाजी ताजी भाजी..! असा विद्यार्थी बाजारात जल्लोष करत होते. यावेळी अन्नदाता सुखी भव, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विद्यार्थी आर्या व्यवहारे, श्रवण बळगाणूरे, अध्यांश शुक्ल यांनी भाषणे केली.