मुंबई

लाडक्या बहिणींना जानेवारीचा हफ्ताची तारीख ठरली; ‘या’ दिवशी खात्यावर जमा होणार

26 जानेवारीच्या आधीच या महिन्याचा हफ्ता मिळणार

लाडक्या बहिणींना जानेवारीचा हफ्ताची तारीख ठरली; ‘या’ दिवशी खात्यावर जमा होणार

26 जानेवारीच्या आधीच या महिन्याचा हफ्ता मिळणार

मुंबई;प्रतिनिधि

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत असून जानेवारी महिन्याचा हफ्ता मिळण्याची तारीख समोर आली आहे. लाडक्या बहिणींना 26 जानेवारीच्या आधीच या महिन्याचा हफ्ता मिळणार असल्याचं राज्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केलं आहे.

या संबंधी माहिती देताना आदिती तटकरे म्हणाल्या की, “26 जानेवारीच्या आधी जानेवारी महिन्याचा लाभ मिळेल असा प्रयत्न सुरू आहे. यासाठी 3,690 कोटींचा निधी आम्हाला मिळणार आहे. अर्थसंकल्पाच्यावेळी देखील महिलांना लाभ कसा मिळेल याची तरतूद आम्ही करणार आहोत.”

आदिती तटकरे म्हणाल्या की, “आम्ही फेब्रुवारीचे नियोजन सुद्धा करत आहोत. लाडकी बहीण योजनेचा लाभ आम्ही 2 कोटी 46 लाख महिलांना दिला. काही महिलांबाबत तक्रार आली होती. ड्युप्लिक्शन झालेल्या केसेस कमी होत्या. त्यामुळे फार काही फरक पडेल असे मला वाटत नाही. थोड्याफार कमी होतील.”

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ कुणाला?

* वय 21 ते 60 वर्षे
* दरमहा 1500 रुपये मिळणार
* दरवर्षी शासन 46000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार
* अंमलबजावणी : जुलै 2024 पासून

कोण असणार पात्र?

* महाराष्ट्र रहिवासी
* विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला
* लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.2.50 लाखापेक्षा जास्त नसावे
* 60 वर्षे पेक्षा जास्त वय असेल तर अपात्र असाल

अपात्र कोण असेल?

* 2.50 लाख पेक्षा जास्त उत्पन्न असणारे
* घरात कोणी Tax भरत असेल तर
* कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असेल तर
* कुटुंबात 5 एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर
* कुटुंबातील सदस्यांकडे 4 चाकी वाहन असेल तर ( ट्रॅक्टर सोडून )

योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

आधारकार्ड , रेशनकार्ड , उत्पन्न दाखला , रहिवासी दाखला , बँक पासबुक , फोटो योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाइल अँप बर/सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात सुविधा मिळेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!