लॉकडाऊनच्या काळातील शेतकऱ्यांची व घरगुती ग्राहकांची वीज बिले माफ करावीत – हर्षवर्धन पाटील.
पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने मागण्यांचे निवेदन वीज वितरण कंपनीकडे देण्यात आले.
लॉकडाऊनच्या काळातील शेतकऱ्यांची व घरगुती ग्राहकांची वीज बिले माफ करावीत – हर्षवर्धन पाटील.
पुणे जिल्हा भाजपचे आंदोलन
इंदापूर:प्रतिनिधी
लॉकडाऊनच्या काळातील शेतकऱ्यांना व घरगुती ग्राहकांना वीज बिले वाढीव रक्कमेची आलेली आहेत.
सदरची वीज बिले अन्यायकारक असून या वीज बिलांना भाजपचा विरोध आहे.
राज्य शासनाने लॉकडाउनच्या काळातील शेतकऱ्यांची व घरगुती ग्राहकांची वीज बिले माफ करावीत, अशी मागणी भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.
पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने गुरुवारी (दि.2) पुणे येथे रास्ता पेठ,वीज वितरण कंपनी कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनप्रसंगी हर्षवर्धन पाटील बोलत होते. केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारनेही शेतकरी व नागरिकांसाठी मदतीचे पॅकेज जाहीर करावे,अशी मागणीही हर्षवर्धन पाटील यांनी केली.
यावेळी सदरच्या मागण्यांचे निवेदन वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्वीकारले.याप्रसंगी माजी मंत्री संजय भेगडे, आ.भीमराव तापकीर, आ.राहुल कुल, भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे व जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने मागण्यांचे निवेदन वीज वितरण कंपनीकडे देण्यात आले.