“लॉकडाऊनच्या काळात माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये जागतिक दर्जाच्या कोरसेरा ऑनलाइन कोर्सेसचे विद्यार्थ्यां व शिक्षकांसाठी आयोजन”
4000 हून अधिक विविध विषयांवर आधारित कोर्सेस व 400 हून अधिक स्पेशलायझेशन सहीत उपलब्ध .
“लॉकडाऊनच्या काळात माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये जागतिक दर्जाच्या कोरसेरा ऑनलाइन कोर्सेसचे विद्यार्थ्यां व शिक्षकांसाठी आयोजन”
4000 हून अधिक विविध विषयांवर आधारित कोर्सेस व 400 हून अधिक स्पेशलायझेशन सहीत उपलब्ध .
बारामती:–माळेगाव येथील शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या अभिवयांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकासाठी महाविद्यालयाच्या वतीने तांत्रिक क्षमता व कौशल्य विकासासाठी महाविद्यालयातर्फे जागतिक दर्जाच्या कोर्सेरा ऑनलाइन कोर्सेस उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
सदर ऑनलाइन कोर्सेस हे 4000 हून अधिक विविध विषयांवर आधारित असुन तसेच 400 हून अधिक स्पेशलायझेशन सहीत उपलब्ध आहेत.कोरसेरा मार्फत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उत्कृष्ठ विद्यापिठातून जसे स्टॅन्डफोर्ड, मिशीगण, ड्युक तसेच मानांकीत कंपन्या उदा. गुगल, आयबीएम, इंटेल , मायक्रोसॉफ्ट इं. जागतिक दर्जाच्या संस्थांमधील तज्ज्ञांनी तयार केलेले कोर्सेस करून विद्यापिठाचे व कंपन्यांचे सर्टीफीकेट्स मिळवण्याची सुवर्णसंधी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एम.मुकणे यांनी दिली.
संपूर्ण देशभरात कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने टाळेबंदी घालण्यात आली आहे.
कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत.
या सुट्टीच्या कालावधीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये तसेच त्यांना घरी राहूनच सुट्टीच्या कालावधीत महाविद्यालयातील शिक्षकांनी तयार केलेल्या व्हिडीओ लेक्चर बरोबरच जागतिक दर्जाच्या विविध कोर्सेसचे शिक्षण घेता यावे यासाठी माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी जवळ-जवळ 4000 इतके ऑनलाईन कोर्सेस कोरसेरा या संस्थेच्या वतीने उपलब्ध करून दिले आहेत.सर्व विद्यार्थ्यांना या कोरसेरा कोर्सेसच्या वतीने कमीत कमी पाच कोर्सेस पूर्ण करण्याचे आवाहन प्राचार्य व शिक्षकांमार्फत विद्यार्थ्यांना करण्यात आलेले आहे.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी तसेच शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी हे कोर्सेस खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.
माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे कोर्सेस घरबसल्या शिकता यावे यासाठी महाविद्यालयाने संधी उपलब्ध करून दिलेली आहे.या संधी अंतर्गत कोरसेरा संस्थेच्यावतीने महाविद्यालयाला ५००० लायसन्स कॉपी उपलब्ध करून दिल्या आहेत.यशस्वीरीत्या कोर्स पूर्ण करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला कोरसेरा मार्फत ई-सर्टिफिकेट उपलब्ध होत आहे.
आतापर्यंत जवळपास 3000 हून अधिक विद्यार्थी व शिक्षकांनी याचा लाभ घेऊन जवळपास 700 कोर्सेस यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत.
या कोर्सेसचा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना खूप मोठा फायदा होत असून विद्यार्थ्यांच्या बरोबरच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सुद्धा अध्यापनासाठी विविध प्रकारचे कोर्सेस लॉकडाऊनच्या कालावधीत शिकत आहेत.
माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन त्यांच्या अंतर्भूत कौशल्याचा उपयोग करिअरसाठी व्हावा तसेच विद्यार्थ्यांना स्वतःचे व्यक्तिमत्त्व विकास उत्तम प्रकारे घडवायचे असेल तर त्यांना कोरसेरा सारखे कोर्सेस करणे खूप महत्त्वाचे आहे.
विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना संचारबंदीच्या कालावधीत घरी बसून विविध कोर्सेस उपलब्ध करून दिल्याने महाविद्यालयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
हे ऑनलाइन कोर्सेस उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालयातील प्रा.माधव राऊळ व प्रा. हेमंत कुंभार यांनी विशेष परिश्रम घेतले.महाविद्यालयाच्या वरील उपक्रमाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष , विश्वस्त व सचिव यांनी अभिनंदन केले.