लॉकडाऊनच्या प्रश्नावर आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं महत्त्वाचं विधान
कठोर निर्णय घ्यावे लागले, तर घेऊच. पण एक नक्की आहे, निर्बंध पहिलं पाऊल असतं. लोकांनी ते पाळले, तर परिस्थिती नियंत्रणात येईल
लॉकडाऊनच्या प्रश्नावर आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं महत्त्वाचं विधान
कठोर निर्णय घ्यावे लागले, तर घेऊच. पण एक नक्की आहे, निर्बंध पहिलं पाऊल असतं. लोकांनी ते पाळले, तर परिस्थिती नियंत्रणात येईल
मुंबई :प्रतिनिधी
लॉकडाऊनच्या प्रश्नावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागणार का, असा प्रश्न त्यांना उपस्थित करण्यात आला होता.
त्यावर उत्तर देताना राजेश टोपे यांनी मोठं विधान केलं. सध्या तरी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेत लॉकडाऊनचा कोणताही विचार आम्ही तूर्तास केलेला नाही, असं राजेश टोपे यांनी म्हटलंय. मात्र संसर्ग खूपच वाढला आणि 700 मेट्रिक टन ऑक्सिजन कन्झ्मशन ) होऊ लागलं, की ऑटोमॅटिक महाराष्ट्रात लॉकडाऊन लागेल, असं राजेश टोपे यांनी म्हटलंय. त्यामुळे लॉकडाऊन बाबत गैरसमज ठेवू नका, असंही ते म्हणालेत. लॉकडाऊनची सध्यातरी शक्यता नाही, मात्र निर्बंध अधिक कडक होतील, असंदेखील राजेश टोपे यांनी म्हटलंय.
ओमिक्रॉनच्या संसर्गाचा वेग वाढतोय. रुग्णसंख्या वाढतेय, त्यामुळे नियम कठोरपणे पाळले गेले पाहिजेत. संख्या वाढू नये, संसर्ग वाढू नये, यासाठीचे उपाय करणं हे पहिलं प्राधान्य आहे, असं राजेश टोपे यांनी म्हटलंय. मुंबई-पुण्यात संख्या वाढतेय, त्यामुळे या शहरांमध्ये अधिक कडक निर्बंध जारी होणार का, असा प्रश्ना टोपे यांनी उपस्थित करण्यात आला होता. त्यावर उत्तर 10-11च्या दरम्यान आहे. मुंबई, ठाणे, पुणे या भागात जास्त पॉझिटिव्हिटी रेट आहे. पॉझिटिव्हिटी रेट, बेड्सची उपलब्धता आणि ऑक्सिजनची उपलब्धता पाहून सरकार योग्य तो निर्णय घेईल असं राजेश टोपे यांनी म्हटलंय.
ऑटोमेटिक लॉकडाऊन म्हणजे….?
लॉकडाऊनचा विषय अजूनतरी नाहीच. निर्बंध वाढवले पाहिजे, यावर विचार सुरु आहे, असं राजेश टोपे यांनी सांगितलंय. त्याचप्रमाणे लॉकडाऊनची भाषा आम्ही तेव्हाच केली, जेव्हा 700 मेट्रिक टन इतकं ऑक्सिजन कन्झ्मशन सुरु आहे. त्यामुळे इतक्या प्रचंड प्रमाणात पुन्हा ऑक्सिजन कन्झमशन सुरु झालं, तर ऑटोमॅटिक लॉकडाऊन लागेल. तशा परिस्थिती लॉकडाऊन ऑटोमोडवर असेल, असंदेखील राजेश टोपे यांनी म्हटलंय.
तर निर्णय घेऊच!
लॉकडाऊनचा परिणाम अर्थकारणावर होतो. लॉकडाऊनची झळ प्रत्येकाला बसली आहे. जान है तो जहान है. त्यामुळे लोकांची काळजी घेणं, यालाच आमचं पहिलं प्राधान्य असणार आहे. कठोर निर्णय घ्यावे लागले, तर घेऊच. पण एक नक्की आहे, निर्बंध पहिलं पाऊल असतं. लोकांनी ते पाळले, तर परिस्थिती नियंत्रणात येईल, असा विश्वास टोपे यांनी बोलताना व्यक्त केलाय.
आज एक टप्पा आपण ठरवून दिलेला आहे. मर्यादा घातलेल्या आहेत. गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी निर्बंध लादण्यात आलेले आहे. त्याचा परिणाम एक दोन दिवसात दिसेल. यावरुन नियंत्रणात आलं, तर ठीक, नाहीतर अधिक कठोर निर्णय घ्यावे लागतील, असंदेखील पत्रकारांशी बोलताना राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
सध्यातरी या गोष्टींनी हात लावलेला नाही!
हॉटेल्स, सिनेमाहॉल्स, शाळा कॉलेज यावर अद्याप निर्णय घातलेला नाही, असं म्हणत या गोष्टींना आम्ही अजूनतरी हात लावलेला नाही, असं राजेश टोपे यांनी म्हटलंय. लसीकरणावर भर देण्यासाठीच्या उपाययोजना सुरु करण्याचं नियोजन सुरु असल्याची माहितीही राजेश टोपे यांनी दिली आहे. दरम्यान, तूर्तास तरी लॉकडाऊनचा कोणताही विचार नसून हॉटेल्स , सिनेमाहॉल आणि शाळा कॉलेज सुरुच राहतील, असंदेखील राजेश टोपे यांनी म्हटलंय.