लॉकडाऊन शिथील व कत्तलखाने सुरू झाले वाचा सविस्तर बातमी.

इंदापुरात पोलिसांची मोठी कारवाई.

लॉकडाऊन शिथील व कत्तलखाने सुरू झाले वाचा सविस्तर बातमी.

इंदापुरात पोलिसांची मोठी कारवाई.

बारामती:वार्तापत्र इंदापूर शहरात लॉकडाऊन मध्ये शिथिलता मिळाली इंदापूरात पोलिसांनी आज टाकलेल्या मोठ्या छाप्यात १०३ गोवंश जनावरे, जनावरांची वाहतूक करण्यासाठी आलेली ६ वाहने व तब्बल सव्वा तीन टन मांस पोलिसांनी जप्त केली.

अपर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी बारामती क्राईम बॅचच्या पथकास इंदापूर येथील कत्तलखान्यावरील कारवाईची सूचना केली होती. इंदापूर पोलिस व बारामती क्राईम बॅच यांनी संयुक्तपणे इंदापूर येथील कत्तलखान्यात अवैधरित्या गोवंश जनावरे यांची कत्तल करून विक्री करत असताना छापा टाकला.

अवैधरित्या गोवंशाची कत्तल करताना हा छापा टाकल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. या छाप्यात मोठे टेम्पो व छोटे टेम्पो मिळून सहा वाहने, या वाहनांमध्ये ९८ जिवंत गोवंश जनावरे, इतर ठिकाणी ३ देशी गायी,१ संकरीत बैल, म्हैस अशी १०३ गोवंश जनावरे ताब्यात घेतली. याच ठिकाणी कापलेले मांस सव्वा तीन टन मिळून आले. या कारवाईत पोलिसांनी १४ लाख ९० हजारांची वाहने व इतर साहित्य जप्तकेले.

या कारवाईत कलीम कयूम कुरेशी (रा. कुरेशी गल्ली तालुका इंदापूर जिल्हा पुणे), वाहिद शब्बीर कुरेशी ( रा. समता नगर अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर), आस्कंन नयुम कुरेशी (रा.कासार पट्टा इंदापूर), रशीद बेपारी (रा.कुरेशी गल्ली ता. इंदापूर जिल्हा पुणे),जमीर बेपारी ( रा. कुरेशी गल्ली ता.इंदापूर), कासम कुरेशी (रा. पान गल्ली बारामती), जमीर रशी (रा. बारामती)
समीर शबरी सौदागर (रा. पंचशील नगर अकलूज) यांच्यावर गुन्हा दाखल केला.तर या व्यतिरिक्त एमएम ४२ एम ६७५९,एमएच ४२ बी ७५२७, एमएच १३ सीयू २०१४, एमएच ४२ एम ६४०९, एमएच
११ एएल २४०८ या वाहनांचे चालक व मालकांविरोधातही पोलिसांनी इंदापूर पोलिस ठाण्यात भा. द. वि. ४२९, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५(अ)(ब)(क) तसेच पशु क्रूरता
अधिनियम १९६० चे कलम ११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इंदापूरातील ही कामगिरी पोलिस अधिक्षक संदीप पाटील, अप्पर पोलिस अधिक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती क्राईम बँचचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर, बारामती शहर पोलिस ठाण्याचे सहायक निरिक्षक सचिन शिंदे, बारामती तालुका पोलिस ठाण्याचे महेश विधाते, इंदापूरचे सहायक निरीक्षक गणेश लोकरे, बिराप्पा लातुरे,बारामती क्राईम बॅचमधील कर्मचारी सुरेंद्र वाघ, स्वप्निल अहिवळे, शर्मा पवार,भाऊसाहेब मोरे व आरसीपी पथकातील 12 पोलिस कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली.

यामध्ये इंदापूर व बारामती पोलिस ठाण्यांमधील मंगेश कांबळे, अमोल नरुटे, पांडुरंग बागल, नाथा जगताप, अविनाश दराडे, तुषार चव्हाण, आमन शेख, जगदीश चौधर, गणेश झरेकर, अमोल गार्डी, विनोद मोरे, विक्रम जाधव,वैभव मदने, गोकुळ हिप्परकर, काका पाटोळे, विक्रम जमादार यांनीही कारवाईत भाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!