लॉकडाऊन संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्पष्टी करण.
पुणे शहरासह पिंपरी चिंचवडमध्ये कडक लॉकडाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश
पुणे शहरासह पिंपरी चिंचवडमध्ये कडक लॉकडाऊन
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश.
लाॅकडाऊ संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्पष्टी करण.
पुणे शहर कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे.
पुणे शहरासह पिंपरी चिंचवडमधील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये १५ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे.
सोमवारच्या मध्यरात्री पासून १५ दिवसांसाठी कडक लॉकडाऊन लागू होणार असे आदेश त्यांनी दिले.
पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून १ हजाराहून अधिक कोरोना रुग्ण सापडले आहेत.
पुणे शहरामध्ये बुधवारी १६१८ अशी संख्या होती तर गुरुवारी ही संख्या वाढून चक्क १८०३ वर गेली.
पुणे शहरामध्ये एकूण १०३२, पिंपरी चिंचवडमध्ये ५७३ आणि पुणे ग्रामीण मध्ये १३७ अशी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये देखील कोरोनाचा फैलाव वेगाने वाढू लागला आहे. रुग्णांची संख्या तीनशे वरून पाचशेवर जाणं चिंताजनक आहे. ग्रामीण भागात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून रुग्णसंख्या पन्नास वरून १५० वर पोहोचली आहे.