लोककलांच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या प्रसिद्धीला दौंड परिसरात चांगला प्रतिसाद
प्रसन्न प्रॉडक्शन्सच्यावतीने दौंड, कुरकुंभ व इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे कार्यक्रम सादर करण्यात आले.
लोककलांच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या प्रसिद्धीला दौंड परिसरात चांगला प्रतिसाद
प्रसन्न प्रॉडक्शन्सच्यावतीने दौंड, कुरकुंभ व इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे कार्यक्रम सादर करण्यात आले.
बारामती वार्तापत्र
राज्य शासनाने दोन वर्षात राबविलेल्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती लोककलांच्या माध्यमातून देण्याच्या जिल्हा माहिती कार्यालयाच्या उपक्रमाला इंदापूर आणि दौंड परिसरात चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
लोकांसाठीच्या योजना सोप्या, सहज आणि लोकांच्या भाषेत सांगितल्या की त्या लोकांपर्यत लवकर पोहोचतात. म्हणूनच या पारंपरिक माध्यमाचा उपयोग ग्रामीण भागापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी केला जात आहे. प्रसन्न प्रॉडक्शन्सच्यावतीने दौंड, कुरकुंभ व इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे कार्यक्रम सादर करण्यात आले.
कोविड काळात नागरिकांना केलेली मदत, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, शिवभोजन थाळी योजना, शेतकऱ्यांसाठी विमा योजना, खावटी योजना, मुला-मुलींसाठी मोफत शिक्षण, ऊस तोड कामगारांसाठी विमा योजना, मेट्रो, महामार्ग, रस्ते सुधार योजना, कामगारांसाठी श्रम ई कार्ड योजना यासह विविध योजनांची लोककलेच्या माध्यमातून माहिती या पथकांनी दिली. कला पथकाच्या कार्यक्रमांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.