
लोकमान्य टिळक यांना अभिवादन.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडून प्रतिमेला पुष्पहार.
बारामती:वार्तापत्र लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच” अशी सिंहगर्जना करणाऱ्या लोकमान्य टिळकांनी मिळवून दिलेल्या ‘स्वराज्या’चे आपण सर्वांनी मिळून ‘सुराज्या’त रुपांतर करुया असे, आवाहन त्यांनी यावेळी केले.