लोकसेवा युथ फाउंडेशन च्या वतीने प्रजासत्ताक दिन अनोख्या पद्धतीने साजरा
अनाथाश्रमातील मुलांना ब्लँकेटचे वाटप करत दिली मायेची ऊब
लोकसेवा युथ फाउंडेशन च्या वतीने प्रजासत्ताक दिन अनोख्या पद्धतीने साजरा
अनाथाश्रमातील मुलांना ब्लँकेटचे वाटप करत दिली मायेची ऊब
बारामती वार्तापत्र
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून लोकसेवा युथ फाऊंडेशन इंदापूर यांच्या वतीने माऊली बाल अनाथ आश्रम सरस्वती नगर इंदापूर येथील अनाथ मुलांना ब्लॅंकेटचे वाटप करत प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.लोकसेवा युथ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गौरव राऊत व मित्र परिवारातील युवकांनी अत्यंत स्तुत्य उपक्रम राबवून समाजामध्ये चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला.
या वेळी प्रशांत उंबरे,अजिंक्य जावीर, व्यंकटेश वाशिंबेकर,राहुल शिंदे,निहाल पठाण,मंगेश घाडगे,संदीप शिंदे,ऋषी चव्हाण,तनिष राऊत,प्रविण शिंदे,प्रज्वल सोमवंशी,शिवतेज दडस,आदित्य चौगुले,अजय भगत,साहील मोमीन,सागर करचे,पवन जाधव,नितीन कदम,मारुती जागताप, रवि क्षीरसागर, सैफ शेख इ.उपस्थित होते.