कोरोनाचे दोन डोस घेतलेल्यांना आता बाहेर पडण्याची परवागनी द्या; अजित पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार
याबाबत मी दोन दिवसात मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे

कोरोनाचे दोन डोस घेतलेल्यांना आता बाहेर पडण्याची परवागनी द्या; अजित पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार
याबाबत मी दोन दिवसात मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे
बारामती वार्तापत्र
कोरोनाचे दोन डोस घेतलेल्यांना आता बाहेर पडण्याची परवागनी दिली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. याबाबत मी दोन दिवसात मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे, असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.
अजित पवार आज पिंपरी-चिंचवडमध्ये होते. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी हे मत व्यक्त केलं. लसीकरण मोठ्या प्रमाणावर झालं आहे. त्यामुळे ज्यांना दोन डोस देण्यात आले आहेत. त्यांना बाहेर पडायला टप्प्याटप्प्याने सुरुवात केली पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. याबाबत मी परवा मुख्यमंत्र्यांशी बोलेल. पण लोकांना बाहेर पडण्याची मुभा द्यावी की देऊ नये याबाबतचे वेगवेगळे मतप्रवाह आहेत. काहींच्या मते इथून पुढे 100 ते 120 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. या दिवसात लोकांनी नियमावलीचं तंतोतंत पालन केलं पाहिजे. सोलापुरातील एका गावात मी गेलो होतो. तेव्हा लोक मास्कशिवाय फिरताना दिसले. अशी बेपर्वाई बरी नाही. एक देखील बाधित व्यक्ती अनेकांना बाधित करू शकते. त्यामुळे बारकाईने वागण्याची गरज आहे, असं पवार म्हणाले.