लोणी देवकर औद्योगिक क्षेत्रात विकासाबाबत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा पुढाकार
उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या समवेत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा.
लोणी देवकर औद्योगिक क्षेत्रात विकासाबाबत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा पुढाकार
उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या समवेत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा.
बारामती वार्तापत्र
आज दि.३ रोजी उद्योग खात्याच्या राज्यमंत्री आदिती तटकरे,राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये उद्योग विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत इंदापूर तालुक्यामधील लोणी देवकर या ठिकाणच्या पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रामध्ये नव्याने येणाऱ्या कंपनींच्या उभारणीबाबत मंत्रालयात झालेल्या बैठकित सकारत्मक चर्चा झाली असल्याबाबतची माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेज वरून दिली.
यामुळे इंदापूर तालुक्यातील होतकरू तरुणांना रोजगाराची संधी निर्माण होणार असून दळणवळण वाढी सोबतच तालुक्याच्या विकासात भर पडण्यास मदत होणार आहे.
या बैठकीमध्ये कंपनी उभारण्या संदर्भात सविस्तर आढावा घेऊन प्रशासकीय पातळीवर योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश ही यावेळी देण्यात आले आहेत.