लोणी भापकर मधील त्यांचे अहवाल ‘निगेटिव्ह’
बारामती तालुक्यातील लोणी भापकर येथील त्या नातेवाईकांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत.त्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे
तालुक्यातील लोणीभापकर येथील ज्येष्ठ महिलेस कोरोनाचा संसर्ग झाला आहे,मात्र यासंदर्भात आरोग्य खात्याने या महिलेच्या संपर्कातील नातेवाईकांचे घेतलेले नमुने मात्र निगेटिव्ह आल्याने लोणीभापकर गावासह तालुका
प्रशासनालाही दिलासा मिळाला आहे.बारामतीतील भाजी विक्रेत्याच्या कुटुंबाचा अपवाद वगळता गेल्या काही दिवसांपासून बारामती तालुक्यात
कोरोनाच्या बाबतीत रुग्ण पॉझिटिव्ह आला तरी त्याच्या संपर्कातील इतरांचे
अहवाल मात्र निगेटिव्ह येत आहेत, ही बाब बारामती तालुक्यासाठी दिलासा
बनली आहे. घाटकोपरहून लोणीभापकर येथे आलेल्या ज्येष्ठ महिलेस कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्या संपर्कातील ५ जणांचे घशातील स्त्रावाचे नमुने आरोग्य खात्याने तपासणीसाठी पाठवले. त्याचा अहवाल आज आला तो निगेटिव्ह आला आहे.