लोप पावत असलेल्या माशांच्या अनेक जातींची मत्स्यबीज केंद्रात विक्री सुरू.
शासनाच्या वतीने मत्स्य बीज केंद्रात पैदास करून विक्री केली जात आहे.
लोप पावत असलेल्या माशांच्या अनेक जातींची मत्स्यबीज केंद्रात विक्री सुरू.
शासनाच्या वतीने मत्स्य बीज केंद्रात पैदास करून विक्री केली जात आहे.
इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
नद्यांमधील पाणी प्रदूषित झाल्यामुळे दिवसेंदिवस गोड्या पाण्यातील मत्स्य संख्या कमी होत चालली आहे,परिणामी अनेक माश्यांच्या जाती लोप पावत आहेत,त्यासाठी शासनामार्फत त्या जातींची पैदास मत्स्य बीज केंद्रात करून त्याची विक्री केली जात आहे.
अनेक माशांचा प्रजनन कालावधी जून ते 15 ऑगस्ट या कालावधी मध्ये असतो त्यामुळे इंदापूर तालुक्यातील मत्स्यबीज केंद्रात सध्या लाखों मत्स्यबीज तयार करण्याचे काम युध्द पातळीवर सुरु आहे, इंदापूर तालुक्यातील उजनी धरणा नजीक असलेल्या शासकीय मत्स्यबीज केंद्रात प्रजननाचे चार प्रयोग सध्या झाले असून यात तब्बल साठ लाख मत्स्यबीज निर्मिती करून विक्री केलेले आहे,दि.(22 जुलै) रोजी मत्स्य प्रजनन करण्याचा पाचवा प्रयोग करण्यात आलेला आहे, शासनाने दिलेल उद्दिष्ट त्यांना पूर्ण करायचे आहे असे असले तरी इंदापूर तालुक्यातील तसेच सोलापूर जिल्ह्यातील जे युवा शेतकरी आहेत ज्यांनी मत्स्य पालन व्यवसाय सुरू केलेला आहे, अशांनी बीज घेऊन जाण्याचे आवाहन मत्स्य अधिकारी राजेंद्र राठोड यांनी केले आहे.
अलीकडच्या काळात शेतकऱ्यांना शेततळ्यातील मत्स्यशेती हा चांगला जोडधंदा विकसित होत आहे. शेततळ्यामध्ये रोहू, कटला, मृगळ या भारतीय प्रमुख कार्प बरोबरच चिनी कार्प गवत्या व सायफरनिस इ. माशांचे संवर्धन करत आहेत , मुख्यत्वे युवा शेतकरी हा शेती सोबत मत्स्य पालन मोठ्याप्रमाणावर करीत आहेत.