डॉ. एम. के. इनामदार यांना समाजरत्न पुरस्कार
हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित..

डॉ. एम. के. इनामदार यांना समाजरत्न पुरस्कार
हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित..
इंदापूर प्रतिनिधी –
इंदापूर येथे जिजाऊ, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख यांच्या जयंतीनिमित्त व पत्रकार दिनानिमित्त क्रांतिज्योती विचार मंच महाराष्ट्र राज्य व राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या विद्यमाने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित केले.
या कार्यक्रमात अकलूज (ता. इंदापूर) येथील डॉ. एम. के. इनामदार व डॉ. साधना इनामदार या दांपत्यास समाजरत्न पुरस्काराने सन्मानित केले. डॉ. दत्तात्रेय गार्डे, डॉ. नामदेव गार्डे, उरुळी देवाची गावच्या सरपंच महानंदा सातव, काटीचे सरपंच सोमनाथ मोहिते, जय नर्सिंग इन्स्टिट्यूटचे जयवंत नायकुडे, उरुळी कांचनचे माजी सरपंच पोपटराव बोराटे, सहजपूरच्या सरपंच सविता मेहेर, इंदापूरबार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. गिरीश शहा, नायब तहसीलदार पूजा मोहिते, फुले विचार अभियानचे संयोजक संपतराव जाधव, माजी विभागीय पोलिस अधिकारी अमोल रामचंद्र मोहिते, सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर राऊत, सातारा जिल्हा माळी संघटनेचे अध्यक्ष जयसिंग लोखंडे, डॉ. रेश्मा शेख, यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित केले. माधुरी लडकत, विनोद रासकर, अमित यादव, रवींद्र वाघमारे, वंदना भोंग, अनिशा लव्हे, रेश्मा रास्ते,सोनाली बनसोडे, काजल शेळके, ज्योती राजेंद्र बनसोडे, वृषाली बनसोडे, आर. के. पांडुरंग बनसोडे, साक्षी बनसोडे, भाग्यश्री नगरे आदी पोलिस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांना सावित्रीमाई फुले पुरस्कार देण्यात आला. तसेच, पत्रकारांनाही सन्मानित केले. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग शिंदे, संपतराव जाधव, इंदापूर बार असोसिएशनचे अॅड. गिरीश शहा, प्रा. कृष्णा ताटे, बाबजी भोंग या मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.