वर्षा गायकवाड यांची महत्वपूर्ण घोषणा,बारावीचा निकाल पुढील आठवड्यात
विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांनी पेपर तपासण्यास स्पष्ट नकार दिला.

वर्षा गायकवाड यांची महत्वपूर्ण घोषणा,बारावीचा निकाल पुढील आठवड्यात
विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांनी पेपर तपासण्यास स्पष्ट नकार दिला.
मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील दहावी-बारावीच्या (SSC-HSC Result) विद्यार्थी-पालकांना निकालाची प्रतिक्षा लागली आहे. याच संदर्भात आज मोठी माहिती समोर आली आहे. बारावीचा निकाल पुढील आठवड्यात लागणार तर दहावीचा त्यानंतर 15 दिवसांनी लागणार असल्याची माहिती संदर्भात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना खालील संकेतस्थळावर पाहता येतील
- www.maharesult.nic.in
- www.maharesult.nic.in
- msbshse.co.in
- hscresult.11thadmission.org.in
- hscresult.mkcl.org
- mahresult.nic.in
कसा पाहाल बारावीचा निकाल, जाणून घ्या सोप्या स्टेप्स –
सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी मंडळाशी संलग्न अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in आणि msbshse.co.in वर जा.
येथे होमपेजवर निकाल पेजवर क्लिक करा.
एका नवीन पेजवर पुनर्निर्देशित केले जाईल.
महाराष्ट्र बारावीचा निकाल 2022 या लिंकवर क्लिक करा.
लॉगिन पेजवर, तुमचा रोल नंबर आणि इतर माहिती भरा
सबमिट करा.
बारावीचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
आता डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.
बारावीची परीक्षा रद्द झाल्यानंतर बारावीचे निकाल जाहीर करताना दहावी, अकरावी आणि बारावी या तिन्ही वर्गाचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यासाठी 30 :30 :40 असा निकष राज्य मंडळाने जाहीर केला आहे. यामध्ये इयत्ता दहावीच्या परीक्षेतील सर्वाधिक गुण मिळालेल्या 3 विषयांचे सरासरी गुण (30%),अकरावीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण (30%) आणि इयत्ता बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा ,सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन गुण (40%) अशा प्रकारचे गुण एकत्र करून बारावीचे निकाल जाहीर केले जाणार आहे.
दरम्यान, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता यंदा राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाद्वारे गुण देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. यासाठी अंतर्गत मूल्यमापनाचे निकषही ठरवले होते. अशातच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील बारावीच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या होत्या. दहावीप्रमाणेच बारावीच्या विद्यार्थ्यांनाही अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारेच आज बारावीचा निकाल दुपारी 4 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर होणार आहे.