
वाचाल तर वाचाल
ग्रंथालयातील जास्तीत जास्त पुस्तके वाचावीत असे आवाहन
बारामती वार्तापत्र
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कै.ग.भि.देशपांडे विद्यालयात ग्रंथदिंडी चे आयोजन करण्यात आले. प्रशालेतून ग्रंथदिंडी सुरू होऊन तीन हत्ती चौकातून परत येऊन कन्या विभागात समारोप झाला. या ग्रंथदिंडीत मंगलवेशात विद्यार्थी उत्साहाने सामील झाले होते.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे पिंपरी चिंचवडचे निवृत्त DYSP रावसाहेब जाधव म्हणाले की वाचनाने मनुष्य ज्ञानी होतो म्हणून विद्यार्थ्यांनी मोबाईल पासून दूर राहून पुस्तक वाचन करावे. वाचाल तर वाचाल.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा मुख्याध्यापिका रोहिणी गायकवाड यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी वाचन करणे अतिशय गरजेचे असल्याने विद्यार्थ्यांनी आपल्या प्रशालेच्या समृद्ध ग्रंथालयातील जास्तीत जास्त पुस्तके वाचावीत असे आवाहन केले.
प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक लेखक व कवी रवींद्र गडकर यांनी विद्यार्थ्यांसमोर स्वरचित मतदार जागृती गीत सादर केले.
तर महान व्यक्तींच्या चरित्रातून आदर्श घेऊनआपण सतत वाचत रहावे असे प्रतिपादन शंकर घोडे यांनी केले. ग्रंथपाल रोहिणी सोनवणे यांनी प्रास्ताविकात विद्यार्थी दशेत वाचनाचे महत्त्व किती आहे ते स्पष्ट केले.
याप्रसंगी उपमुख्याध्यापक राजाराम गावडे,पर्यवेक्षक शेखर जाधव,दिलीप पाटील,जयश्री शिंदे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.यानिमित्ताने महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी व शाला समिती सदस्य यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
आशा कांबळे व रेवती झाडबुके यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.भूषण भोये यांनी सूत्रसंचलन केले तर मारुती नेवसे यांनी आभार मानले.