वाढीव हद्दीत कोरोना सर्वेक्षण साठी नागरिकांचा प्रतिसाद
एमआयडीसी परिसरातील परप्रांतीय मजूर व कामगार यांना हिंदी मधून समाज प्रबोधन करून मास्क चे वाटप करण्यात आले.

वाढीव हद्दीत कोरोना सर्वेक्षण साठी नागरिकांचा प्रतिसाद
एमआयडीसी परिसरातील परप्रांतीय मजूर व कामगार यांना हिंदी मधून समाज प्रबोधन करून मास्क चे वाटप करण्यात आले.
बारामती वार्तापत्र
बारामती नगरपरिषद च्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कोरोना सर्वेक्षण साठी बारामती शहर व वाढीव हद्दीतील रुई,जळोची,तांदुळवाडी,एमआयडीसी ,सुयश नगर मध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला रविवार दि.21 मार्च रोजी नगरपरिषद मधील अधिकारी व कर्मचारी आणि नगरपरिषद शाळा मधील शिक्षक यांच्या साह्याने प्रत्येक घरोघरी जाऊन कोरोना विषयी प्रत्येक कुटूंबाची माहिती घेणे,ऑक्सिजन व तापमान पातळी तपासणे आदी माहिती घेऊन जर कोरोना विषयक लक्षणे असल्यास त्वरित डॉक्टर किंवा शासकीय रुग्णालयात नेहण्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आली होती.
या वेळी मास्क वापरा,सॅनिटायझर चा वापर करा व आवश्यकता असल्या शिवाय घराच्या बाहेर जाऊ नका ज्येष्ठ नागरिक किंवा वय वर्ष 45 च्या पुढे असल्यास कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी सुचवण्यात आले या विषयी जनजागृती करण्यात आली.कोरोनाची लक्षणे काय आहेत या विषयी माहिती देण्यात आली.रुई व एमआयडीसी परिसरातील परप्रांतीय मजूर व कामगार यांना हिंदी मधून समाज प्रबोधन करून मास्क चे वाटप करण्यात आले.