दौंड

वारकरी मंडळाच्या पश्चिम महाराष्ट्र पुणे विभागीय अध्यक्षपदी ह.भ.प.श्री.दत्तात्रय महाराज सोळसकर यांची निवड

अखिल भारतीय वारकरी मंडळच्या माध्यमातून पुणे विभागातील वारकरी बंधूचे प्रश्न सोडवणार असल्याचे यावेळी सोळसकर महाराज यांनी सांगितले.

वारकरी मंडळाच्या पश्चिम महाराष्ट्र पुणे विभागीय अध्यक्षपदी ह.भ.प.श्री.दत्तात्रय महाराज सोळसकर यांची निवड

बारामती वार्तापत्र

दौंड तालुका वारकरी सांप्रदायाचे भूषण,कासुर्डी ता.दौंड येथील रहिवाशी हभप.दत्तात्रय महाराज सोळसकर यांची अखिल भारतीय वारकरी मंडळ पश्चिम महाराष्ट्र ( पुणे,सातारा,सांगली,
कोल्हापूर,सोलापूर) अध्यक्षपदी निवड करण्यात आली.सदर निवड राष्ट्रीय अध्यक्ष हभप.प्रकाश महाराज बोधले,केंद्रीय सदस्य शंकर महाराज शेवाळे,यांनी केली.
गेली १५ वर्षा हून अधिक दौंड तालुका अध्यक्ष हि जबाबदारी चांगल्या पद्धतीने सांभाळत असताना पश्चिम महाराष्ट्रात सदस्य म्हणून काहि महिन्यांपूर्वी नियुक्ती करण्यात आली.मध्यंतरी दौंड तालुका कार्य कारणी निवड मोठ्या उत्साहात पार पडली.आज अचानक राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाशजी महाराज बोधले यांनी फोन करुन आनंदवार्ता कळवली व नियुक्तीपत्रक पाठवले.श्री.दत्तात्रय महाराज सोळसकर हे २५ वर्षे पासून किर्तन,प्रवचन,व्याख्यान या माध्यमातून समाजप्रबोधन करीत आहेत.तसेच १९९० पासून भुलेश्वर प्रासादिक दिंडी नंबर ४५ अखंड देहू ते पंढरपूर पायीवारी करीत आहेत.त्यांना श्रीकृष्ण सेवा राज्यस्तरीय पुरस्कारांसह विविध ४० हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे.
अखिल भारतीय वारकरी मंडळच्या माध्यमातून पुणे विभागातील वारकरी बंधूचे प्रश्न सोडवणार असल्याचे यावेळी सोळसकर महाराज यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!