वालचंदनगर क्रिकेट स्पर्धेचे राजवर्धन पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण
इंदापूरच्या हाजी मस्तान संघाने पटविला चषक
वालचंदनगर क्रिकेट स्पर्धेचे राजवर्धन पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण
इंदापूरच्या हाजी मस्तान संघाने पटविला चषक
इंदापूर :प्रतिनिधी
राजवर्धन पाटील मित्र परिवार वालचंदनगर यांच्या वतीने वालचंदनगर येथे भरविण्यात आलेल्या भव्य क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण नीरा भीमा कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
तत्पूर्वी अंतिम सामान्याचा प्रारंभ राजवर्धन पाटील यांच्या हस्ते नाणेफेक करून रविवारी ( दि. 6) करण्यात आला. द एम्पायर फाउंडेशनचे आकाश भोसले व विजय चितारे यांनी सदरच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले होते. इंदापूरच्या हाजी मस्तान संघाने सामना जिंकून अंतिम पारितोषिक पटकावले.
गेली 4 दिवस चालू असणाऱ्या या स्पर्धेची अंतिम लढत हाजी मस्तान इंदापूर व नातेपुते येथील संघात झाली. अंतिम सामन्याचा राजवर्धन पाटील यांनी मनसोक्त आनंद घेतला व युवा वर्गाला प्रोत्साहित केले. अंतिम सामन्याला नीरा-भीमा कारखान्याचे चेअरमन लालासाहेब पवार, शरद चितारे,इंदापूर अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन सत्यशील पाटील, सरपंच कुमार गायकवाड, इंदापूर सोशल मीडियाचे उपाध्यक्ष विक्रमसिंह मोरे, पुणे जिल्हा सरचिटणीस गजानन वाकसे, लासुर्णे गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य नेताजी लोंढे, ग्रामपंचायत सदस्य संजय नकाते व मान्यवर उपस्थित होते.
युवा नेते राजवर्धन पाटील हे अंतिम सामन्यास उपस्थित असल्यामुळे युवक वर्गात जल्लोष पाहायला मिळाला. तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक वालचंदनगर संघाने तर चौथे पारितोषिक मगराचे निमगाव संघाने पटकावले. सदरच्या मॅचेसचे यशस्वी आयोजन करण्यासाठी अनिल कांबळे, सुनील कांबळे, पका चव्हाण, तुषार भोसले, अभी भांगे, अविनाश चंदनशिवे, सोनू रणपिसे, सागर भोसले, दादा कांबळे, श्रीनिवास पाटील, आशिष भोसले, छोटू चितारे, निखिल ढोबळे, संकेत कांबळे, इन्नुस पठाण, विपुल लोंढे, गोटू मोरे व युवक वर्गाने परिश्रम घेतले. मॅचेसचे अंपायर करणेसाठी उरळीकांचन येथील प्रसिद्ध काकडे सर यांनी काम पाहिले.