वालचंदनगर पोलीसांची उत्तम कामगिरी 10 मोटारसायकलसह चोर अटकेत
रात्रगस्त वाढवुन चोरट्याचा शोध सुरु केला
वालचंदनगर पोलीसांची उत्तम कामगिरी 10 मोटारसायकलसह चोर अटकेत
रात्रगस्त वाढवुन चोरट्याचा शोध सुरु केला
बारामती वार्तापत्र
वालचंदनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढल्याने मा. पोलीस अधिक्षक श्री अभिनव
देशमुख सो. मा. मिलिद मोहिते सो. अपर पोलीस अधिक्षक सो. बारामती विभाग पुणे ग्रामीण यांनी गुन्हे उघडकीस
आणणेबाबत मार्गदर्शन सुचना देवुन आदेशित केले होते.
श्री नारायण शिरगावकर सो. उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग बारामती यांचे सुचनेप्रमाणे वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनीगुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्री अतुल खंदारे यांचे विशेष पथक नेमुन तपासाबाबत सुचना दिल्या होत्या त्यानुसार वालचंदनगर बाजारपेठ, भवानीनगर, जंक्शन, कळस येथे रात्रगस्त वाढवुन चोरट्याचा शोध सुरु केला होता.
दि. 16/02/2021 रोजी वालचंदनगर पोलीस स्टेशन ला नेचर डिलाई डेअरी येथुन मोटारसायकल चोरी झालेबाबत वालचंदनगर पोलीस स्टेशन ला गु.र.नं. 59/2021 भा.द.वि. कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेल्या मोटारसायकलबाबत स.पो.नि. दिलीप पवार सो. यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे श्री अतुल खंदारे यांना सुचना दिल्या होत्या त्यानुसार पोलीस अंमलदार प्रकाश माने 833 यांनी गोपनीय बातमीच्या आधारे त्यांनी इसम नामे कृष्णा शिवाजी कांबळे रा. खानोटा ता.दौड जि. पुणे यास ताब्यात घेवुन त्याचेकडे विचारपुस करता त्याने गुन्ह्य केल्याचे कबुल करुन गुन्ह्यात चोरी केलेली मोटारसायकल काढुन दिलेली आहे .
त्याचकडे अधिक चौकशी करता त्याने भिगवण पोलीस स्टेशन हद्दीत 3 गुन्हे, बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 2 गुन्हे व दौड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 1 गुन्हा वालचंदनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 1 गुन्हा व अजुन 03 मोटारसायकलची खात्री करण्याचे काम चालु आहे.
सदरची कारवाई मा. श्री अभिनव देशमुख सो. पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण, मा. श्री मिलिद मोहिते सो. अपर पोलीस अधिक्षक सो. बारामती विभाग बारामती यांचे सुचनेप्रमाणे मा. श्री नारायण शिरगावकर सो. उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग बारामती यांचे मार्गदर्शनाखाली श्री. दिलीप पवार सहायक पोलीस निरीक्षक वालचंदनगर पोलीस स्टेशन, गुन्हे प्रकटीकरण विभागाचे श्री अतुल खंदारे पोलीस उपनिरीक्षक वालचंदनगर पोलीस स्टेशन पोलीस अंमलदार प्रकाश माने 833, प्रमोद बनसोडे 1935 यांनी पार पाडली आहे.