वालचंदनगर पोलीस स्टेशन हद्दीतील कोरोना वाढीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दीचे ठीकाणी सोशल डीस्टंन्सींग न पाळणाऱ्या हॉटेल,मंगलकार्यालय,शॉपिंग सेंटर, हॉकर्स यांच्यावर कारवाई
कोविड १९ बाबत गावपातळीवर केलेली कामगीरी

वालचंदनगर पोलीस स्टेशन हद्दीतील कोरोना वाढीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दीचे ठीकाणी सोशल डीस्टंन्सींग न पाळणाऱ्या हॉटेल,मंगलकार्यालय,शॉपिंग सेंटर, हॉकर्स यांच्यावर कारवाई
कोविड १९ बाबत गावपातळीवर केलेली कामगीरी
बारामती वार्तापत्र
वालचंदनगर पोलीस स्टेशन हद्दीतील अंथुर्णे गावचे हद्दीतील वाघ वस्ती, उकळमाळा, ता इंदापुर, जि पुणे येथे आरोपी नामे १)अफ्रूज शब्बीर शेख वय १९, २) संतोष सुखदेव तोरणे,वय ३५, ३) मिनार शब्बीर शेख, वय २२, ४) तेजेस विक्रम बनसोडे, वय २४, ५) विशाल लक्ष्मण जगताप, वय २३, ६) सौरभ दिलीप भोसले, वय ३०, ७) राजेश बाळु साळवे, वय ३०वर्षे, ८) शिवाजी साहेब लोंढे, वय २३ वर्षे, ९) अभिजीत लक्ष्मण चोरमले, वय ३३ वर्षे, १०) अशोक सुभाष तोरणे, वय ३० वर्षे, ११) गणेश लहु कांबळे, वय ३२ वर्षे, १२) सुनिल मच्छींद्र बनसोडे,वय २८ वर्षे, १३) सागर महादेव बनसोडे, वय २० वर्षे, १४) मंगेश दगडु काटे, वय २४ वर्षे, १५) रसीक श्रीमंत जाधव, वय १९ वर्षे, १६) संदीप रमेश साबळे, वय ३० वर्षे सर्व रा.नवदारे, ता. इंदापुर जि.पुणे. यांनी मा.जिल्हाधिकारी सो पुणे. यांचे आदेशांचे उल्लंघन करून मास्क न लावता सोशल डिस्टन्सिंग न पाळता मटणाच्या पार्टी करिता गर्दी करून नियमाचे उल्लंघन करतांना मिळुन आले आहेत.
म्हणून वालचंदनगर पोलीस स्टेशन यांनी वरील आरोपींविरूध्द भा.द.वी कलम २६९,१८८ भारतीय साथीचा रोग अधिनियम १८९७ चे कलम २,३,४ मुंबई पोलीस कायदा कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील गुन्हयाचा तपास वालचंदनगर पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
कोविड १९ बाबत गावपातळीवर केलेली कामगीरी
वालचंदनगर पोलीस स्टेशन, इंदापुर पोलीस स्टेशन तसेच इंदापुर तहसील कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र लासुरणे यांचे मार्फत जंक्शन चौक या ठिकाणी विनाकरण फिरणाऱ्या १४८ नागरीकांची कोरोना चाचणी करूण त्यामध्ये २३ पॉझिटिव्ह मिळुन आले आहेत.