वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणे आता चांगलेच महागात पडणार,केंद्राकडून वाहतुकीच्या नियमांमध्ये काही बदल लागू
रविवारी मध्यरात्रीपासून नव्या नियमांच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे.
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणे आता चांगलेच महागात पडणार,केंद्राकडून वाहतुकीच्या नियमांमध्ये काही बदल लागू
रविवारी मध्यरात्रीपासून नव्या नियमांच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे.
प्रतिनिधी
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणे आता चांगलेच महागात पडणार आहे. केंद्राकडून वाहतुकीच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. नव्या बदलानुसार जर तुम्ही नियमांचे उल्लंघन करताना पकडले गेल्यास तुम्हाला आठ ते दहा पट अधिक दंड भरावा लागणार आहे. रविवारी मध्यरात्रीपासून नव्या नियमांच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. दंडाची रक्कम वाढवण्यात आल्याने, वाहनचालक नियमांचे उल्लंघ करणे टाळतील आणि अपघाताला आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दंडाच्या रकमेमध्ये वाढ
वाहतूक पोलिसांच्या आदेशाचे उंल्लघन केल्यास पूर्वी 200 रुपयांचा दंड आकारण्यात येत होता. मात्र आता त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. सुधारीत नियमानुसार तुम्ही जर पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन केले तर पहिल्या वेळेस 500 रुपये तर दुसऱ्या वेळेस 1500 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. परवाना नसताना वाहन चालवल्यास आता तुम्हाला तब्बल 5 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. पूर्वी परवाना नसताना वाहन चालवण्यासाठी केवळ 500 रुपयांची तरतूद होती. जर तुमच्याकडे वाहनांचे अधिकृत कागदपत्रे नसतील तर तुमच्याकडून 500 रुपयांचा दंड आकारण्यात येत होता. मात्र आता ही रक्कम वाढून 5 हजार इतकी करण्यात आली आहे. कारण नसताना हॉर्न वाजवल्यास पूर्वी 200 रुपयांचा दंड होता. मात्र आता त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. आता विनाकारण हॉर्न वाजल्यास पहिल्यावेळी पाचशे तर दुसऱ्यावेळी तब्बल 1500 रुपयांचा दंड वसूल करण्यात येणार आहे. जर तुम्ही विनाहेल्मेट गाडी चालवताना आढळल्यास पहिल्यावेळेस 500 रुपयांचा तर दुसऱ्या वेळेला दीड हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात येणार आहे. पूर्वी दंडाची ही रक्कम केवळ 500 रुपये इतकी होती.
अपघाताला आळा बसेल
दरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघ केल्यास होणाऱ्या दंडाच्या रकमेमध्ये वाढ करण्यात आली आहे. लोकांनी वाहतूक नियमाचे पालन करावे हाच या पाठीमागे उद्देश आहे. देशभरात अपघाताची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाहतुकीचे नियम पाळून सुरक्षीत ड्रायव्हींग केल्यास अपघात टळू शकतात. अपघातामध्ये मृत्यूमुखी पडणारे शेकडो जीव वाचू शकतात. त्यामुळे दंडाच्या रकमेमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुधारीत नियम रविवारी मध्यरात्रीपासून लागू झाल्याची प्रतिक्रिया संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.