वाहतुकीबाबत जनजागृती करून दंडात्मक कारवाई सुद्धा करणार : अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते.
वाहतुकीबाबत जनजागृती करून दंडात्मक कारवाई सुद्धा करणार : अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते.
पंधरा पोलीस स्टेशनच्या अवैध व्यवसायावर कारवाई करण्याचे दिले आदेश.
बारामती: बारामतीत तुलनेने इतर गुन्हेगारांचे प्रमाण कमी असुन वाहतुकीबाबत समस्या मोठी आहे त्यामुळे वाहतुकीबाबत जनजागृती करून दंडात्मक कारवाई करणार असल्याचे बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंदे मोहिते यांनी आगामी योजनांबद्दल पत्रकारांशी साधलेल्या संवादात बोलताना सांगितले.
पोलिस दल अधिक लोकाभिमुख करण्याचा आपला प्रयत्न आहे. कायदा व सुव्यवस्था राखतानाच पंधरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध व्यवसायांविरुद्ध जोरदार कारवाई करण्याचे आदेश ही संबंधित अधिकार्यांना दिले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
बारामती क्राईम ब्रँचचे काम उत्तम सुरु होते. आता स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे दुसरे युनिट बारामतीत सुरु करण्याची योजना आहे. त्यासाठी नवीन अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले जातील, अशी माहिती मोहिते यांनी दिली. वाहतूक कोंडी व अन्य मुद्यांवर संबंधितांशी चर्चा करून नागरिकांना दिलासा देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे मोहिते यांनी सांगितले.
नागरिकांमध्ये केवळ वाहतुकीबाबत जनजागृती करुन फारसा उपयोग होत नाही, असा अनुभव आहे. त्यामुळे दंडात्मक कारवाई करावी लागते व ती प्रभावीही ठरते. त्यामुळे जनजागृती सुरु ठेऊन दंडात्मक कारवाईही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. विना हेल्मेट दुचाकी चालवणे, चार चाकी वाहन चालवताना सीट बेल्ट न लावणे या गुन्ह्यांसाठीही कारवाई करण्यामागे अपघातात कुणाचा जीव जाऊ नये, हीच आमची भावना असल्याचे मोहिते म्हणाले. अवैध व्यवसायाबाबत नागरिकांनीही काही त्रुटी असतील तर त्या कळवाव्यात, असे आवाहन मोहिते यांनी केले.
बारामतीच्या ’क्राईम ब्रँच’ची फेररचना होणार बारामतीत पत्रकारांशी संवाद साधताना नूतन अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते यांनी आगामी योजनांबद्दल माहिती दिली. पोलिस दल अधिक लोकाभिमुख करण्याचा आपला प्रयत्न असून कायदा व सुव्यवस्था राखतानाच अवैध व्यवसायांविरुद्ध आम्ही जोरदार कारवाई करू, असा इशाराही मिलिंद मोहिते यांनी दिला. बारामतीमध्ये कार्यरत असलेली गुन्हे शाखा अर्थात क्राईम ब्रँच बरखास्त केली आहे लवकरच या शाखेची फेररचना करण्यात येणारअसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.