वाहनधारकांना खुशखबर, फास्टट्रॅक वापरा आणि पाच टक्के सूट मिळवा
फास्टट्रॅक धारक वाहनांची संख्या वाढण्यासाठी घेतला मोठा निर्णय
वाहनधारकांना खुशखबर, फास्टट्रॅक वापरा आणि पाच टक्के सूट मिळवा
फास्टट्रॅक धारक वाहनांची संख्या वाढण्यासाठी घेतला मोठा निर्णय
बारामती वार्तापत्र
वाहनधारकांनी फास्टट्रॅक चा वापर मोठ्या प्रमाणात करण्यासाठी व टोलनाक्यावरील गर्दी कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने फास्ट धारकांना पाच टक्के सूट दिली आहे.
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग व राजीव गांधी सागरी सेतू या पथकर नाक्यांवर फास्टस्ट्रक धारक वाहनांना पाच टक्के सवलत मिळणार आहे ही सवलत 11 जानेवारीपासून लागू होणार असल्याचे सहव्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांनी सांगितले.
पुणे-मुंबई द्रुतगती, वांद्रे-वरळी सेतू मार्गाने प्रवास करणारे प्रत्येक फेरीला पथकराच्या पाच टक्के रक्कम वाहनधारकांच्या फास्टॅग बँक खात्यात महामंडळामार्फत थेट जमा होईल.
फास्टट्रगचा वापर वाढावा या हेतूने महामंडळाने कार जीप व एसयूव्ही या वाहन करता मर्यादित कालावधीसाठी ही योजना लागू केली आहे. फास्ट्रगधारक वाहनांच्या संख्येत वाढ होण्यासाठी द्रुतगती मार्गावरील खालापूर तळेगाव पथकर नाका फूड मॉल पेट्रोल पंप अशा वेगवेगळ्या ठिकाणी बँकांच्या मदतीने फास्टट्रॅक स्टॉल सुरू करण्यात आला आहे त्याचबरोबर प्रसिद्धी माध्यमात प्रसिद्धी देण्यात येत आहे