विकास कामात हयगय केली तर खपवुन घेणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार
बेरोजगारांकडून कोणी पैसे उकळले तर थेट मला सांगा
![](https://baramatiwarta.in/wp-content/uploads/2021/01/e12f4787-530e-4617-bfdc-3ea1c4d98684.jpg)
विकास कामात हयगय केली तर खपवुन घेणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार
बेरोजगारांकडून कोणी पैसे उकळले तर थेट मला सांगा
बारामती वार्तापत्र
आपल्या कार्यशैली बद्दल व स्पष्टवक्तेपणा बद्दल अजित पवार राज्यभर प्रसिद्ध आहेत त्याविषयी वेगळे सांगायला नको. कोणतेही काम वेळेत आणि दर्जेदार असायलाच पाहिजे असेही त्यांनी आपल्या भाषणात अधिकारी व ठेकेदारांना आठवण करून दिली.
अजित पवार यांचा आज पूर्णवेळ बारामती दौरा नियोजीत होता त्याप्रमाणे सकाळी सहाला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे विकास कामे पाहण्यासाठी निघाले. शहरात चालू असलेले निरा डावा कालव्याचे अस्तरीकरण कामावर ते पोहोचले या ठिकाणी सिमेंट कॉंक्रीट ला ओलावा राहण्यासाठी टाकण्यात आलेले गोणपाट( पोते )स्वतः उचलून त्याखालील कामाचा दर्जा पाहिला आणि अस्तरीकरणाच्या ठिकाणी असलेल्या पायऱ्याचा दर्जा व्यवस्थित नसल्याचे त्यांना जाणवलं मग संबंधित ठेकेदार अधिकारी यांना खडे बोल सुनावले मात्र तोपर्यंत अधिकारी व कंत्राटदार यांची पाचावर धारण बसली होती.
जनतेच्या पैशाचा सुयोग्य वापर करावा लागतो
मी सकाळी सकाळीच कामाला सुरुवात करतो. रात्रीचं जर दिसत असतं तर रात्रीही कामे केली असती, मात्र दिवस उजाडण्याची वाट पाहावी लागते. पवार साहेब 80 व्या वर्षातही विकास कामांविषयी उत्साही असतात. मीही साठीत आहे पण तरीही कामाचा उत्साह वाढतो आहे, त्यामुळे कामे दर्जेदार करा अन्यथा खैर नाही अशी तंबी द्यायलाही ते विसरले नाहीत.
बेरोजगारांकडून पैसे उकळले तर डायरेक्ट तुरुंगात टाकीन ,
आज बारामतीत माझा व्यवसाय, माझा हक्क स्वयंरोजगाराची संधी निर्माण करून देणाऱ्या कार्यक्रमाचा प्रारंभ बारामतीत अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी त्यांनी फसवणूक करणाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले या योजनेची अंमलबजावणी अन्य तालुक्यातही प्रभावीपणे करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या गरजूंना याचा लाभ व्हावा ,मात्र या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कोणी पैसे घेत असेल तर त्याची माहिती तात्काळ कळवा.जे पैसे घेतील त्यांना जेलमध्ये पाठवले जाईल. गरजू व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळेल याविषयी अधिकारी व पदाधिकारी यांनी दक्षता घ्यावी. या योजनेसाठी प्रशिक्षण घेण्यासाठी राष्ट्रवादी भवन अथवा इतर सहकारी संस्थांच्या सभागृहात जागा उपलब्ध करून दिली जाईल. बारामती तालुका राज्यात एक नंबर वर राहील यासाठी मी प्रयत्न करत असतो.असेही त्यांनी सांगितले.
बारामतीकरांची प्रेम भरपूर आहे
निरा डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाला काही लोकांनी विरोध केला. यामुळे आमचं पाणी जाईल असं त्यांना वाटत होतं पण काहीही चांगलं सुरू करायचं झालं की त्यात आडकाठी आणायची अशी जित्राबं लय वाईट असतात. पण तुम्ही अजिबात विचार करू नका. तुम्ही बाहेरचा कोणी इथे आलं तर त्याचा डिपॉझिट जप्त करून परत पाठवता. असं तुमचं काम आहे अशा शब्दात त्यांनी बारामतीकरांचे आभार मानले