विद्याचंद्र मुंबईकर यांच्या पुढाकारातून बारामतीतील कोरोना निवारणासाठी ३८ लाखांचा निधी.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निधी सोपवण्याचा घेतला निर्णय.
विद्याचंद्र मुंबईकर यांच्या पुढाकारातून बारामतीतील कोरोना निवारणासाठी ३८ लाखांचा निधी.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निधी सोपवण्याचा घेतला निर्णय.
बारामती;वार्तापत्र
बारामतीतील काही मान्यवरांनी पुढाकार घेत काही वर्षांपूर्वी बारामती आय हॉस्पिटल उभारणीचा मानस केला होता. त्यासाठी निधीही जमा करण्यात आला होता. परंतु यात अडचणी निर्माण झाल्यामुळे हॉस्पिटल उभारणी होवू शकली नाही. त्यामुळे आता या हॉस्पिटलसाठी जमा झालेला तब्बल ३८ लाख रुपयांचा निधी बारामतीत कोरोनाग्रस्तांसाठी वापरण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. येथील ज्येष्ठ व्यापारी विद्याचंद्र मुंबईकर यांनी याबाबत पुढाकार घेतला आहे.
बारामतीतील ज्येष्ठ व्यापारी विद्याचंद्र मुंबईकर, स्व. विनोदशेठ गुजर आणि स्व. डॉ. एम. आर. शहा यांच्यासह काही मान्यवरांनी बारामती आय हॉस्पिटलची उभारणी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु काही कारणास्तव तो पूर्णत्वास आला नाही. त्यामुळे विद्याचंद्र मुंबईकर यांनी हा निधी बारामतीतील कोरोना निवारणासाठी देण्याबाबत पुढाकार घेतला आहे. त्यानुसार चंद्रवदन मुंबईकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत हा ३८ लाख रुपयांचा निधी कोरोना निवारणासाठी वापरण्याची विनंती केली. अजित पवार यांनीही त्यास मान्यता दिली आहे.
बारामतीतील ज्येष्ठ मान्यवरांनी स्थापन केलेल्या या ट्रस्टचा निधी कोरोना निवारणासाठी वापरण्यात येणार आहे. त्यासाठी संपूर्ण प्रक्रिया करून तो निधी प्रशासनाकडे देण्याबाबतच्या सूचनाही ना. अजित पवार यांनी दिल्या आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत बारामतीत कोरोना निर्मूलनासाठी हा निधी उपलब्ध होईल, अशी माहिती चंद्रवदन मुंबईकर यांनी दिली.