विद्याप्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय बारामती येथील प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची पालक सभा यशस्वी संपन्न
कार्यक्रमाचा उद्देश हा विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्यामध्ये सुसंवाद घडावा
विद्याप्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय बारामती येथील प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची पालक सभा यशस्वी संपन्न
कार्यक्रमाचा उद्देश हा विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्यामध्ये सुसंवाद घडावा
बारामती वार्तापत्र
विद्याप्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय बारामती येथील प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची पालक सभा ११ जून २०२२ रोजी महाविद्यालयाच्या कोंन्फरन्स हॉलमध्ये घेण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमासाठी पालकांचे प्रतिनिधी म्हणून लाभलेले श्री. सत्यप्रेम लगड व श्रीमती. हेमलत्ता जगदाळे यांचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्री. रा. स. बिचकर व डॉ. अपर्णा सज्जन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर प्रथम सत्रामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळविले, तसेच वर्गात चांगली उपस्थिती दाखविली, विविध कार्यक्रमात चांगले यश संपादन केले अशा विद्यार्थ्यांचा सत्कार प्राचार्य व शिक्षक यांच्या हस्ते करण्यात आला.
त्यानंतर प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या संपूर्ण शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांसाठी कोणकोणते उपक्रम राबविले जाणार आहेत व ते विद्यार्थ्यांसाठी कसे उपयुक्त आहेत व आजवर कोणकोणते उपक्रम राबविले आहेत याची संपूर्ण माहिती स्लाईड शोच्या माध्यमातून डॉ. अनिल हिवरेकर व डॉ अपर्णा सज्जन यांनी छोट्याशा पडद्यावर अत्यंत चांगल्याप्रकारे समजेल अशा ओघवत्या भाषेत सर्वांसमोर सादर केली. तसेच विद्यार्थ्यांची वर्गातील उपस्थिती, वेळेचे योग्य नियोजन, अभ्यास व व्यायाम याचे विद्यार्थी जीवनातील महत्व त्यांनी विद्यार्थ्यांना पाठवून दिले. त्यानंतर डॉ. दि. भ. हंचाटे, श्री. सुरज कुंभार, श्री. डी. एम. पडूळकर, श्री. साहिल शहा यांनी त्यांच्या त्यांच्या विभागातील माहितीचे महत्वपूर्ण व मोलाचे मार्गदर्शन केले.
तसेच महाविद्यालयाची विद्यार्थी प्रतिनिधी कु. सिद्धी पोपडे हिने आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमामध्ये डॉ. रा. स. बिचकर यांनी आपल्या भाषणात या महाविद्यालयातून उद्याचे भावी अभियंते तर घडतीलच परतू ते उद्याचे भावी आदर्श नागरिक घडले पाहिजेत असा मनोदय व्यक्त केला.
या संपूर्ण कार्यक्रमाचा उद्देश हा विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्यामध्ये सुसंवाद घडावा, यांच्यामध्ये समन्वय असावा व आपल्या पाल्याची
प्रगती हि पालकांना कळावी त्याच बरोबर आपल्या पाल्याच्या सर्वागीण विकासासाठी महाविद्यालय कोणकोणते उपक्रम राबविते याची कल्पना पालकवर्गाला असावी या उद्दात हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी कु. सुमित्रा कदम व आकांक्षा कळंत्रे यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रथम वर्ष विभागात अध्यापन करणारे सर्व शिक्षक तसेच, डॉ. सचिन भोसले, डॉ. राजवीर शास्त्री, डॉ. नितीन जाधव, डॉ. अनिल डिसले, डॉ. नितीन शेळके, डॉ. अनिल पाटील, श्री. दीपक सोनवणे, श्रीमती गौरी भोईटे, प्रसारमाध्यम विभागाचे सुनिल भोसले हे सर्व उपस्थितीत होते. या संपूर्ण कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रा. स. बिचकर याचे महत्वपूर्ण सहकार्य व मोलाचे मागर्दर्शन लाभले. हा कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.